आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबा कांबळे खून प्रकरण : पाणीवेस येथील गामा पैलवानसह ६ अटकेत; एक जण फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सत्यवान ऊर्फ आबा कांबळे याच्या खूनप्रकरणी सहा जणांना २४ तासांत अटक झाली. एकजण गायब आहे. २००४ मध्ये ऋतुराज शिंदे याचा खून झाला होता. त्यात आबा कांबळे मुख्य आरोपी हाेता. तो निर्दोष सुटला होता. मात्र काही महिन्यांपासून शिंदे व कांबळे यांच्यात रागाने का पाहतोस, यावरून शाब्दिक चकमक उडत होती. त्यातूनच शुक्रवारी कट रचला गेला. शनिवारी पाळत ठेवून कोयत्याने हल्ला करण्यात आला. 


सुरेश उर्फ अभिमन्यू शिंदे (गामा पैलवान, वय ६८, रा. पाणीवेस), गणेश उर्फ अभिजित चंद्रशेखर शिंदे (वय २५,रा. निराळे वस्ती), रविराज दत्तात्रय शिंदे (वय २६, रा. शाहीर वस्ती), प्रशांत उर्फ अप्पा पांडुरंग शिंदे (वय ३०, रा. शाहीर वस्ती), नीलेश प्रकाश महामुनी (वय ३५, दत्त चौक), तौसिफ गुडूलाल विजापुरे (वय २७ रा. मेहताबनगर, शेळगी) यांना अटक झाली. विनित कोणारे (रा. पुणे) हा गायब आहे. शनिवारी घटनेनंतर पाचजण सात रस्ता येथे एकत्र जमले. तेथून अक्कलकोट, गाणगापूर, इंडी येथे जाऊन दुसरीकडे जाण्यासाठी बसची वाट पाहात थांबले होते. फौजदार चावडी पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर इंडीजवळ त्यांना ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज, घटनेच्या चौकशीनंतर कारवाई झाल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी पत्रकारांना सांगितले. 


घटनेची पार्श्वभूमी : ऋतुराज शिंदे व आबा कांबळे हे दोघे जीवलग मित्र होते. दोघांमध्ये घरगुती संबंधही होते. 


बंदोबस्तात अंत्यसंस्कार 
१ रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर आबाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस बंदोबस्तात जुना पुना नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. मोठी गर्दी होती. 
२ संशयित कोणारे हा पुण्याच्या दिशेने पळून गेला आहे. गामा पैलवान घटनेनंतर शेतामध्ये रात्रभर जाऊन बसले होते. अन्य पाच जण फिरत होते. 
३ आबा व त्याचे मित्र अजय व पप्पू रायगडला सहलीसाठी जाणार होते. त्याचीच चर्चा शनिवारी दुकानासमोर करीत थांबले होते. हल्लेखोरांनी अाबाला गाठून हल्ला केला. 
४ रविवारी नवी पेठ, दत्त चौक परिसर, डीसीसी बँक परिसरातील दुकाने बंद होती. जमावाने दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती केली. दगडफेकीची अफवाही पसरली. घटनास्थळी पोलिसांनी दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. काही दुकाने उघडली. उपायुक्त चौगुले यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. 
५ संशयित विजापुरे हा हॉटेलमध्ये काम करतो, नीलेश हा सोनाराकडे कामाला आहे, अभिजित व प्रशांत दोघेजण खासगी काम करतात. रविराजचा हाॅटेल व्यवसाय आहे. कोणारे हा शिंदेचा पाहुणा असून, पुण्यात राहतो. 

बातम्या आणखी आहेत...