आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत विकासासाठी सोलापूरचा मुर्सिया शहराशी सामंजस्य करार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हवा, पाणी, ध्वनिप्रदूषण, सांडपाणी, ऊर्जा व्यवस्थापनास गती देणे, ऐतिहासिक वारसा क्षेत्रांचे संवर्धन करणे, पायाभूत सुविधासाठी खासगी व सार्वजनिक भागीदारी करणे आदी प्रकारचे करार सोलापूर आणि मुर्सिया शहरांमध्ये करण्यात आले. 


काय होईल? 
नागरी समस्या हाताळण्यासाठी एकमेकांना संपर्क साधता येईल. ज्ञानाचे अादान प्रदान करण्यास परवानगी दिली   जाईल. प्रशिक्षण घेता येतील. शहर विकासासाठी स्थानिक कृती विकास योजना दोन वर्षांपर्यंत राबवता येईल. प्राधान्यक्रमांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी खासगी व व्यावसायिक क्षेत्राचा सहभाग असणार आहे. दोन वर्षे तांत्रिक व सहाय्यभूत आदान-प्रदान करणार आहे. सार्वजनिक योजना सहकार्याने होतील. यासाठी दोन्ही शहरातील तज्ज्ञांचे दौरे होतील. यात पाच राजकीय व तांत्रिक प्रतिनिधी असतील. स्मार्ट सिटी करण्यासाठी मुर्सिया शहराची मदत मिळेल. सोलापुरातील व्यापार त्या शहरात नेणे, यंत्रमाग, चादर आदी कामे तेथे पोहचवण्यास मदत मिळेल. शिक्षण व नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध पध्दतीचा वापर आदी. 


दोन वर्षात प्रगती करू 
शहर शाश्वती सामंजस्य करार दोन वर्षांचा असून, यात आराखड्यानुसार काम करू. विकासासाठी दोन्ही शहरे मदत करतील, असे पीअर राॅर्बटो यांनी सांगितले. अांतरराष्ट्रीय पातळीवर काम होेणार आहे, अशी माहिती महापौर बनशेट्टी यांनी दिली. मार्केटिंग व नागरी सुविधा सुधारण्यात फायदा होईल, असे आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक सुभाष शेजवाल, श्रीनिवास करली, प्रभारी नगर अभियंता संदीप कारंजे, विजय राठोडसह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


असे आहे मुर्सिया शहर 
स्पेनमधील सातवे सर्वात मोठे शहर. कोरदोबाचे सुलतान अब्दुल रहमान यांनी सन ८२५ मध्ये या शहराची स्थापना केली. सुमारे पाच लाख लोकसंख्या. सिगरा नदी काठी वसलेले निसर्गरम्य परिसर. फुले, फळे आदी कृषी उपन्नासाठी प्रसिद्ध. सन १२७२ची स्थापना असलेल्या मुर्सिया विद्यापीठात ३८ हजार विद्यार्थी शिकत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...