आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर, बार्शी बाजार समिती सभापतींची १६ जुलैला निवड; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती निवडीची प्रक्रिया १६ जुलै रोजी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भाेसले यांनी दिले आहेत. बाजार समिती निवडणूक कायद्यानुसार निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत सभापती निवड करावी, असे कायद्यात नमूद आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर व बार्शी बाजार समिती सभापतीची निवड प्रक्रिया १६ जुलै रोजी होणार आहे. 


सोलापूर बाजार समितीमध्ये काँग्रेस महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सोलापूर बाजार समितीच्या सभापती पदासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सभापती दिलीप माने, बाळासाहेब शेळके यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे आता पुढील राजकीय गणिते समोर ठेवून सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची प्रतीक्षा आहे. बार्शी बाजार समितीमध्ये राऊत गटाला ९, सोपल गटाला ६ तर मिरगणे गटाला २ जागा मिळाल्या आहेत. एकाही गटाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने कोण कोणाला सोबत घेणार हे पाहावे लागणार आहे. मात्र मिरगणे यांना सोबत घेऊन राऊत गटाचाच सभापती होणार, अशी चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...