आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती : ८१ उमेदवारांचा शड्डू; पालकमंत्री महाआघाडीकडून तर सिद्रामप्पा पाटील अपक्ष!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर बाजार समिती निवडणुकीत ३३० पैकी २४९ जणांनी अर्ज माघारी घेतले. संचालकांच्या १८ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. महाआघाडीकडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, माजी सभापती इंदुमती पाटील, सुरेश हसापुरे तर सहकारमंत्री गटाकडून माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार, इंद्रजित पवार, रामप्पा चिवडशेट्टी रिंगणात आहेत. मुस्ती गणातून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील तर कुंभारी गणातून सिद्धाराम चाकोते यांनी उमेदवारी अर्ज ठेवला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार रतिकांत पाटील, मनोहर सपाटे, श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह २४९ जणांनी माघार घेतली. 


अर्ज माघारीनंतर सहकारमंत्री गटाकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी श्री सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलची घोषणा करून अंतिम १५ उमेदवारांची नावे जाहीर केली. दुसरीकडे महाआघाडीकडून आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलची घोषणा करून अंतिम १५ जणांची नावे जाहीर केली. कळमण, मार्डी, बाळे, मुस्ती व नान्नज मतदारसंघातून प्रत्येकी ३, पाकणी व हिरज मतदारसंघातून २, बोरामणी मतदारसंघातून ८, कुंभारी व कणबस मतदारसंघातून प्रत्येकी ७, होटगी व मंद्रूप मतदारसंघातून ५, कंदलगाव व भंडारकवठे मतदारसंघातून ४ तर औराद मतदारसंघातून ६ अशा एकूण १५ शेतकरी मतदारसंघातून ६५ जण रिंगणात आहेत. व्यापारी गणातून ५ तर हमाल-तोलार मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात आहेत. 


दिग्गजांनी दंड थोपटले 
पालकमंत्री विजयकुमार देशमुख कुंभारी मतदारसंघातून तर माजी आमदार दिलीप माने हिरज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार शिवशरण पाटील भंडारकवठे गणातून तर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील मुस्ती गणातून लढणार आहेत. माजी संचालक सिद्धाराम चाकोते कुंभारी गणातून अपक्ष उभे आहेत. बुधवारी चिन्ह वाटपानंतर प्रचाराचा नारळ फुटेल. 

बातम्या आणखी आहेत...