आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या अपिलावर सोमवारी होणार निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर व बार्शी बाजार समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयावर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते. सोलापूर बाजार समितीच्या ११ अपिलांवर गुरुवारी तर बार्शी बाजार समितीच्या १६ अपिलांवर शुक्रवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही अपिलांवरील निर्णय सोमवारी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. मंगळवारी (दि. १९) अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. 


शुक्रवारी बार्शी बाजार समितीच्या १६ अपिलावर सुनावणी झाली. जिल्हाधिकारी यांच्यासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यामध्ये गणेश जाधव यांनी विजय राऊत, रणवीर राऊत यांच्याविरोधात अपील केले होते. महेंद्र गायकवाड यांनी ज्ञानेश्वर अर्जुन माळी तर ज्ञानेश्वर माळी यांनी राजेंद्रकुमार गायकवाड यांच्या अर्जावर, अमोल जाधव यांनी महेश गायकवाड, राजेंद्र मिरगणे यांच्या अर्जावर, कपील कोरके, बाळासाहेब कोरके यांनी राजेंद्र मिरगणे, चेतन काशीद, वासुदेव गायकवाड, साहेबराव देशमुख यांच्या अर्जावर अपील दाखल केले होते. भगवंत पाटील, चेतन काशीद यांनी सुधीर सोपल, योगेश सोपल यांच्या अर्जावर तर राजेंद्र मिरगणे, संदीप उकिरडे यांनी सुधीर सोपल यांच्याविरोधात अपील दाखल केले होते. १६ अर्जापैकी ४ अपील सुधीर सोपल यांच्याविरोधात तर योगेश सोपल व राजेंद्र मिरगणे यांच्याविरोधात प्रत्येकी दोन अपील दाखल करण्यात आले होते. 


निवडणुकीपूर्वीच राजकीय डावपेच 
काँग्रेसच्या ताब्यातील सोलापूर बाजार समिती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील बार्शी बाजार समिती काढून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने सर्व बाजूने तयारी केली आहे. सोलापूर बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले दिलीप माने यांच्यासह इतर उमेदवार तर बार्शी बाजार समितीसाठी अर्ज दाखल केलेले सुधीर सोपल, योगेश सोपल, राजेंद्र मिरगणे यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्याने निवडणुकीपूर्वीच चुरस निर्माण झाली आहे. यामुळे आता सोमवारी अपिलांवर काय होणार यावर निवडणुकीचे चित्र ठरेल. 

बातम्या आणखी आहेत...