आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश देऊनही रेल्वे स्टेशन परिसरात मटक्याचा बाजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात कुठेही मटका सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना देते, अशी हमी पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी सोमवारी दिली. मात्र त्याचा मटका बुकींवर काहीही परिणाम झाल्याचे दिसले नाही. बुधवारीस्टेशन परिसरात मटक्याचा जणु बाजारच भरला होता. 


अलीकडच्या काळात मटका पुन्हा खुलेआम झाल्याचे चित्र आहे. याबाबत पोलिस डोळेझाक करत आहेत. मटका सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करणार, अशी भूमिका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. जे सामान्य सोलापूरकरांना दिसते ते पोलिसांना दिसत नाही, हे कसे? रस्त्यावर खुलेआम मटका सुरू आहे. पोलिसांची भीती नसल्याचेच यातून दिसते. आयुक्तपदी सेनगावकर असताना मटका खुलेआम नव्हता. 


कट्ट्यावर मटका 
रेल्वे स्टेशनच्या समोरील धर्मशाळेच्या वळणावर जाधव पान शॉपच्या अलीकडे मटक्याचा जणू बाजारच भरतो. जागो जागी मटक्याच्या टपऱ्या आहेत. या टपऱ्यांवर तुफान गर्दी असते. येथे गर्दी हाताळणे अवघड जात असल्यामुळे समोरील कट्ट्यावर बसून मटका घेतला जात आहे. इतका खुलेआम असलेला मटका पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यायची वेळ का यावी, हा खरा प्रश्न आहे. 

 

सर्व ठाण्यांच्या प्रमुखांना निर्देश दिले आहेत. दोन दिवसांत मटका टपऱ्या आणि बुकी चालकांवर निश्चित कारवाई होईल. 
- अपर्णा गीते, पोलिस उपायुक्त 

बातम्या आणखी आहेत...