आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: अभियांत्रिकी प्रवेशाची पहिली फेरी जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेशाची पहिली कॅप राऊंड व जागा वाटप शनिवारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागामार्फत संकेतस्थळावर जाहीर झाले.

विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्रमाने अभ्यासक्रम व महाविद्यालय मिळालेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रम व संस्थेमध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेश फेरीमध्ये भाग घेता येणार नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश केंद्रावर (ARC) शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा व त्यानंतर संबंधित महाविद्यालयामध्ये सर्व मूळ कागदपत्रे व महाविद्यालयाची फीस भरून प्रवेश घ्यावयाचा आहे.

 

प्रवेश निश्चितीसाठी एक हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने, डेबिट/ क्रेडिट कार्डद्वारेच भरावयाचे आहेत, याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. याबाबत मोफत सुविधा महाविद्यालयाच्या सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असून प्रवेशाबाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी दिली.

 

वालचंद अभियांत्रिकीच्या ५४० पैकी २७८ जागा राखीव असल्याने २६२ जागांवर १०० टक्के विद्यार्थ्यांनी पसंती दिली. तेथे जैन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ५१ टक्के जागा आरक्षित आहेत. यातील १४२ जागांवर जैन विद्यार्थ्यांनी पसंती दिली. उर्वरित १३६ जागा दुसऱ्या फेरीत खुल्या होणार आहेत.

 

पहिल्या फेरीत पसंती क्रम
श्री विठ्ठल, पंढरपूर ४३२
वालचंद, सोलापूर ४०४
सिंहगड, कोर्टी २६७
आॅर्किड, सोलापूर २५३
सिंहगड, सोलापूर १५८
एमआयटी, बार्शी १२४
शेळवे, शेळवे १२२
एजी पाटील, साेरेगाव ७८
फॅबटेक, सांगोला ६१
बीग्सी, केगाव ५६
बीएमआयटी, बेलाटी ५५
व्हीव्हीपी, सोरेगाव ४२
अकलूज ३२

 

बातम्या आणखी आहेत...