आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन, नागरिकांची गर्दी, खाद्य पदार्थांना मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने होम मैदान येथे सुरू असलेल्या जिल्हा कृषी महोत्सवात विविध आकर्षक व नव्या वस्तूंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. सेंद्रिय कृषी उत्पादने, शेतकी औजारे व विविध योजना यांचा तर यात समावेश आहेच, त्याबरोबरच विविध बचत गट आणि उपकरणांची माहिती येथे देण्यात येत आहे.

 

या कृषी महोत्सवात नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या कृषी मालांची दालने मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच शेतकी औजारे, ट्रॅक्टरचे विविध प्रकार, पॉवर टिलर, पाण्यातील मोटारपंप, डाळिंबाची वाइन, ज्यूस, गुळ शर्करा पावडर, शुगर फ्री साखर, पापड, लोणची आदींची दालने आहे. परंतु काही दालनांनी उपस्थितांचे मन जिंकण्यात यश संपादन केल्याचे दिसून येत आहे. जवळपास तीन किलाेचे संत्रे व तितकेच मोठे ड्रॅगन फ्रूट येथे पाहण्यास उपलब्ध आहे. शिवाय ही परराज्यातील उत्पादने नसून, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेली आहेत, हे विशेष. कृषी प्रदर्शनात बालकामगारांनी तयार केलेल्या अाकर्षक वस्तू पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 

 

कडकनाथ कोंबडीचे सर्वात जास्त आकर्षण 

विविध दुर्धर आजारांवर औषध म्हणून काम करणारी काळ्या रंगाची कडकनाथ कोंबडी हे आकर्षण ठरत आहे. या कोंबडीचा केवळ रंगच काळा नाही, तर आतील मांस, रक्त ही काळेच असते. शिवाय हिच्या एका अंड्याची किंमत ३० ते ५० रुपये आहे. कोंबडी १२०० रुपयांना एक तर कोंबडा ८०० रुपयांना आहे. 

 

बालकामगारांच्या कलात्मक वस्तू 
शहर व जिल्हातील बालकामगार प्रकल्पातील मुलांनी विविध प्रकारच्या वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात त्यांनी केलेल्या टाकाऊपासूनच टिकाऊ वस्तू, लोकर, फर, काचा, प्रेशस स्टोन वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे यांच्या किमती बाजारभावापेक्षा खूपच कमी आहे. त्या वस्तू प्रदर्शन आहेत 

 

बातम्या आणखी आहेत...