आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर, लासलगाव, मनमाडला अवकाळी पावसाने झोडपले; 50 च्या वर झाडे कोसळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी तीन वाजल्यापासून आपले रौद्ररूप शहरवासीयांना दाखवले. तासाभरातच दोन इंच पावसाची नोंद झाली. ५० च्या वर झाडे पडली, तर ३०० च्या वर झाडांच्या फांद्या तुटल्या. विडी घरकुल, शुक्रवार पेठ येथे घरांचे पत्रे उडाले. बुधवार पेठ परिसरात घरांमध्ये पाणी साचले, तर भवानी पेठ परिसरात एका बालिकेचा घराचा सज्जा व भिंत कोसळून मृत्यूही झाला.


वालचंद महाविद्यालय जवळ, सात रस्ता शर्मा स्विटजवळ, कामत हॉटेल जवळ, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह तसेच शहराच्या विविध भागात झाडे उन्मळून पडली. शांती चौक पाणी टाकी जवळ व वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज समोर झाड पडून वाहतूक काही काळ बंद झाली. मातंग वस्ती , पाथरूट चौक येथे ही मोठे झाड पडले. सोलापूर न्यायालय परिसर येथे मोठे झाड रस्त्यावर आडवे पडले. नागरिकांनीच ते बाजूला केले. चार पुतळा परिसरात ही एक गुलमोहोराचे झाड पडले.  


वर गारा, घरात पाणी
न्यु बुधवार पेठ, विजापूर रोड, होटगी रस्ता, शेळगी, बाळीवेस, टिळक चौक येथे गारांचा पाऊस पडला. शेंगदाण्याच्या आकाराच्या गारा अर्धा तास पडत होत्या. मुकुंद नगर व राजीव गांधी नगर भागात पावसामुळे नागरिकांच्या घरात आल्याने रहिवाश्यांची त्रेधातिरपीठ उडाली. मोदी स्मशानभूमी जवळील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने रामवाडी व लिमयेवाडीकडे जाणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ झाली. तसेच या पावसा दरम्यानच जोराचे वारे वाहात असल्याने एकंदर शहरातील वाहतूक ही थांबली होती. रंगभवन रस्ता, नाथ प्राईड येथे तर गुडघ्या च्यावर पर्यंत पाणी साचले होते.  शहरातील बाळे अंबिका नगर, विडी घरकूल, घोंगडे वस्ती, मिलींद नगर, बुधवार पेठ, माणिक चौक, शुक्रवार पेठ, मुल्लाबाबा टेकडी आदी ठिकाणी घरावरचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली.

 

दहावर्षीय मुलीचा मृत्यू

मूळची घोंगडे वस्ती येथील रहिवासी असणारी दिव्य गजानन गजेली  (१०) ही मागील दोन दिवसांपासून सोलापुरातील आजीकडे आली होती. परंतू या पावसाच्या तडाख्यात घराची भिंत व सज्ज्याचा काही भाग तिच्या अंगावर पडल्याने तिचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...