आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुडाच्या राजकारणाला मतदारच उत्तर देतील : बळीराम साठे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजार समितीमध्ये माजी संचालकांनी ३९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ऑडिटमधून जाणीवपूर्वक उघडकीस आणले. त्यानंतर संचालकावर गुन्हे दाखल केले. हे सर्व सुडाच्या राजकारणातून केले असून या कारवाईमुळे जनतेत चीड निर्माण झाली आहे. याला आता मतदानाद्वारे जनताच उत्तर देईल, असे प्रतिपादन जि.प.चे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केले. 


कौठाळी (ता. उत्तर सोलापूर) येथे श्री सिद्धेश्वर शेतकरी पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रकाश वानकर, नगरसेवक गणेश वानकर, सुनील पाटील, मनोहर जगताप, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी आदी उपस्थित होते. बाजार समिती निवडणूक ही विचारांची लढाई असून पालकमंत्री भाजपचे असूनही त्यांनी आम्हाला सोबत केली आहे. काँग्रेस, शिवसेना व भाजप हे सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्याने जनताच निर्णय घेणार आहे. पृथ्वीराज माने यांनी सुडबुद्धीचे राजकारण विरोधक करीत आहेत, मात्र सिद्धेश्वर पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माने यांनी व्यक्त केला. जयदीप साठे यांनीही मनोगत व्यक्त केले. नगरसेवक गणेश वानकर यांनी आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते, पण आमची ती संस्कृती नाही. पराभव दिसत असल्यानेच सहकारमंत्र्यांचा तोल सुटल्याचे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...