आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती निवडणूक; भाजप, काँग्रेसकडून उमेदवारांची उसनवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजार समिती निवडणूक पक्षावर होत नसते, असे सोयीचे विधान राजकीय पक्षांकडून केले जात असले तरी निवडणुकीत मात्र राजकीय पक्षाच्या लोकांना उमेदवारी दिली जाते. त्याचाच प्रत्यय काल मंगळवारी अर्ज माघारी घेतेवेळी आला. सहकारमंत्री गटाच्या सिद्धरामेश्वर पॅनलने काँग्रेसच्या निष्ठावंतांना जवळ करीत उमेदवारी बहाल केली तर काँग्रेसने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना कुंभारी गणातून संधी देऊन विरोधी गटाला शह दिला. पण काही मतदारसंघामध्ये नाराज अपक्षांनी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना आव्हान दिले आहे. 


कुंभारी गणातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना महाआघाडी प्रणीत सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने संधी दिली आहे. पण काँग्रेसकडूनच अर्ज दाखल केलेल माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते यांनी संधी न दिल्याने काँग्रेसविरोधात बंड पुकारले आहे. कणबस गणातही काँग्रेसने शिवसेनेचे अमर पाटील यांना संधी दिल्याने काँग्रेसचे हरीष पाटील यांनी अर्ज कायम ठेवला आहे. अशीच स्थिती कंदलगाव गणामध्ये आहे. 


काँग्रेसचे सुरेश हसापुरे यांच्याविरोधात ऐनवेळी बदल करीत दिलीप माने यांचे समर्थक असलेले आप्पासाहेब पाटील यांना भाजपने उमेदवारी देऊन चुरस वाढविली आहे. कळमण मतदारसंघात जितेंद्र साठे यांच्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते संग्राम पाटील यांना भाजपने उमेदवार दिली आहे. यामुळे ही लढतही चुरशीची होणार आहे. सिद्धरामेश्वर पॅनलकडून भंडारकवठे मतदारसंघामध्ये अर्ज माघारीच्या ३० मिनिटे शिल्लक असेपर्यंत उमेदवार ठरला नव्हता. कुंभारी येथे पालकमंत्री यांच्यासोबत प्रचाराचा शुभारंभ केलेले माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार यांना शेवटच्या काही वेळामध्ये भंडारकवठे गणातून संधी देण्यात आली. 


तिसरी आघाडी रिंगणात... 
राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीने बाजार समिती बचाव पॅनल स्थापन करून दोन्ही पॅनलविरोधात दंड थोपटले आहे. या पॅनलला नारळ चिन्ह मिळाले आहेत. पॅनलमध्ये भंडारकवठे गणातून बसवराज बगले, कुंभारी गणातून विजय हत्तुरे, मंद्रूप गणातून विजयालक्ष्मी बिराजदार, होटगी गणातून सिद्धाराम बोळीगार, कंदलगाव गणातून मायाप्पा व्हनमाने, औराद गणातून श्रीशैल वाले, कणबस गणातून तमण्णा घोडके, बोरामणी गणातून प्रमोद गायकवाड, बाळे गणातून शांता भवर, कळमण गणातून शहाजी मते, नान्नज गणातून जावेद पटेल, हमाल-तोलार मतदारसंघातून राहुल बनसोडे यांचा समावेश आहे. 


यापूर्वी विरोधात, आता सोबत 
मागील बाजार समिती निवडणुकीत हसापुरे-साठे यांच्या विरोधात दिलीप माने यांचे पॅनल होते. आता मात्र त्याच्या उलट स्थिती आहे. दिलीप माने यांच्या सोबत होते, ते श्रीमंत बंडगर माने यांच्याविरोधात हिरज गणातून निवडणूक लढवत आहेत. हसापुरे यांच्या पॅनलमधून निवडणूक लढविलेले सिद्धाराम हेले आता सहकारमंत्री यांच्या गटाकडून निवडणूक लढवत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...