आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप माने यांनाच सभापतिपदाची संधी? बाजार समिती सभागृहात सोमवारी होणार निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजार समिती निवडणुकीत सहकारमंत्री गटाला जोरदार टक्कर देऊन काँग्रेस महाआघाडीने १५ पैकी १३ जागांवर विजय मिळविला. पण आता सभापतिपदाची संधी कोणाला ? यावर चर्चा सुरू आहे. सभापतिपदासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सभापती दिलीप माने व बाळासाहेब शेळके यांची नावे चर्चेत असली तरी अंतिम निर्णय सुशीलकुमार शिंदे घेणार आहेत. पण बाजार समितीची सध्याची स्थिती पाहता दिलीप माने यांनाच सभापतिपदाची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. 


निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी १६ जुलै रोजी सभापती निवडीची तारीख निश्चित केली आहे. नवनिर्वाचित संचालकांची सकाळी ११ वाजता बाजार समिती सभागृहात बैठक बोलाविली आहे. सुरुवातीला सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज मागविण्यात येतील, त्यानंतर छाननी होईल. छाननीनंतर अर्ज माघार घेण्यासाठी संधी दिली जाईल. एकापेक्षा अधिक अर्ज असतील तर मतदान घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी २ वाजता सभापती निवड जाहीर करण्यात येणार आहे. 


तर दिलीप माने यांना संधी...
बाजार समितीच्या संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याविषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. शिवाय स्वीकृत संचालक म्हणून पुन्हा सहकारमंत्री गटाचे संचालक बाजार समितीमध्ये येण्याची शक्यता आहे. विरोधी संचालकांची ताकद कमी करण्यासाठी, त्या संचालकांना योग्य उत्तर देण्यासाठी आणि बाजार समितीचा कार्यभार अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी पुन्हा एकदा दिलीप माने यांच्या नावाचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे. दक्षिण विधानसभा निवडणुकीचा विचार करता सभापती पदाची बाळासाहेब शेळके यांनाही संधी मिळू शकते. 


बाजार समिती सभापती निवडीबाबत माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे व बळीराम साठे निर्णय घेणार आहेत. अद्याप यावर कोणतीही चर्चा झाली नाही. रविवारी श्री. शिंदे सोलापुरात असून सर्व संचालकांशी चर्चा करून नाव निश्चित करण्यात येईल. 
- दिलीप माने, माजी सभापती, सोलापूर बाजार समिती.

बातम्या आणखी आहेत...