आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीसाठी युती ना आघाडी; माझा मतदारसंघ, मी उभा राहणार! पालकमंत्री विजयकुमार देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुंभारी मतदारसंघात माझ्या उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या मोठी आहे. अर्ज भरला आहे, मी निवडणूक लढवणार आहे. कोणाला विचारण्याची गरज नाही. निवडणुकीत कोणाशी युती करणार नाही, कोणाशी आघाडी करणार नाही. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी लढवावी. कुंभारी येथे शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. त्यांनी योग्य उमेदवार निवडावा असे आवाहन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. 


बाजार समितीसाठी निवडणूक सुरू आहे. १९ जूनला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यापूर्वी नेत्यांच्या भेटी-गाठी सुरू आहेत. सोमवारी सकाळी पालकमंत्री देशमुख यांनी कुंभारी येथे शेतकरी मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार शिवशरण पाटील, अप्पासाहेब बिराजदार आदी उपस्थित होते. 


सहकारमंत्री यांच्याकडून प्रस्ताव आल्यास तुम्ही स्वीकारणार का? यावर पालकमंत्री देशमुख म्हणाले, ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात नाही. कुंभारी गणातून वैयक्तिक पातळीवर निवडण्ूक लढवणार आहे. माझ्याकडे कोणी प्रस्ताव घेऊन आलेला नाही. 


नेत्यांनी घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी 
अक्कलकोट मतदारसंघातील बोरामणी, कुंभारी गणांमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनीही शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. सोमवारी सायंकाळी मुस्ती, बोरामणी, तांदूळवाडी आदी गावांमध्ये बैठका घेऊन मते जाणून घेतली. उमेदवार कोण असावा? याची चाचपणी केली जात आहे. येत्या आठवड्यात मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी वाढणार आहेत. 


चार जागांची केली मागणी 
बाजार समिती निवडणुकीत शरद पवार साहेबांनी काँग्रेससोबत राहण्याचा आदेश दिला आहे. काँग्रेसकडे बाजार समिती निवडणुकीत चार जागांची मागणी केली आहे. यामध्ये उत्तरमधील तीन तर दक्षिणमधील मंद्रूप ही जागा मागितली आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नाही. लवकरच दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. त्यामध्ये निर्णय होईल. आम्ही आमच्या मागणीवर ठाम राहू.
- बळीराम साठे, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद 

बातम्या आणखी आहेत...