आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत संपलेल्या गाळ्यांची यादी मनपा वेबसाइटवर; लिलाव स्थगितीचे अधिकृत पत्र अद्याप आले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका मेजर व मिनी गाळ्यांच्या ई लिलावास शासनाने स्थगिती दिल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप याबाबत महापालिकेकडे अधिकृत पत्र आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने प्रक्रिया थांबवलेली नसून सुरूच ठेवली आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येत आहे. 


महापालिका गाळ्यांचे ई लिलाव होऊ नये म्हणून व्यापारी प्रयत्न करत आहेत. दरम्यान व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी लिलावास स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याबाबतचे अधिकृत पत्र महापालिकेस शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्राप्त नव्हते. त्यामुळे महापालिकेने लिलावाची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. महापालिकेच्या जागा ज्यांना नाममात्र भाड्याने दिल्या त्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गाळ्यांची माहिती देत असताना महापालिकेतील यंत्रणा अद्ययावत करण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे. गाळ्यांची मुदत कधी संपली, त्याचे आताचे भाडे किती, ते कोणाच्या ताब्यात आहे याची माहिती देण्यात येत आहे. नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने संकेतस्थळावर माहिती देण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...