आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानक महामंडळ करणार सोलापूर स्थानकाचा पुनर्विकास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर. भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाची स्थापना झाली असून, हे निवडक ७० स्थानकांचा विकास करणार आहे. मध्य रेल्वेतील सहा स्थानकांचा विकास केला जाणार असून, यात सोलापूरचा समावेश केला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या सुविधा केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी खर्च किती केला जाईल, याचे तपशील सांगितलेले नाहीत. 

 

नुकतेच रेल्वे बोर्ड चेअरमन अश्वनी लोहाणी यांनी ७० स्थानकांची यादी जाहीर केली. यात मध्य रेल्वेतील सोलापूर, पुणे, नागपूर, मुंबई, बुऱ्हाणपूर, लोणावळा आदींचा समावेश केला आहे. सरकते जिने, लिफ्ट, ट्रॅक अॅपरन यांच्यासह स्थानक इमारतीचे विस्तारीकरण, वेटिंग रूम, रिटायरींग रूमची संख्या वाढविणे, वाॅटर एटीएम आदी सुविधा वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच यंदा प्रथमच स्थानकावर प्रवाशांसाठी सेल्फी पॉइंट व मीटिंग पॉइंटची संकल्पना राबवली जाणार आहे. स्थानकावर येणाऱ्या व्हीआयपी प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाचे लॉन्ज तयार केले जाणार आहे. यात आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार डीआरएम व जीएम यांना देण्यात आले. स्थानिक इंटिरियर डिझायनरशी या कामी मदत घेतली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...