आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांचा अचानक संप, एसटी सेवा झाली ठप्प, प्रवाशांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप सुरू केला. सांगोला वगळता सर्वत्र संपास प्रतिसाद मिळाला. सोलापूर विभागातील १४६० पैकी सुमारे १५० बस मार्गावर धावल्या. अचानक संप केल्याने प्रवाशांची ऐनवेळी तारांबळ उडाली. अनेक प्रवासी रात्री बारानंतर स्थानकावर अडकले. त्यांना सकाळपर्यंत थांबावे लागले. शुक्रवारी दिवसभर प्रवाशांचे हाल होत राहिले. एसटी प्रशासन मात्र काहीच करू शकले नाही. 


वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेल्याने पंढरपूर, करमाळा, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, माढा, अकलूज आदी ठिकाणची एसटी सेवा पूर्णपणे बंद होती. सांगोला येथे ८० टक्के सेवा बंद होती. अकलूज येथे एका चालकाने अन्य कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास अडथळा आणल्याने त्यांच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


दिवसभर संपाचा परिणाम जिल्ह्यात दिसून येत होता. संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे जास्त हाल झाले. त्यांना जीप, टमटम, अॅपे रिक्षाच्या आधार घ्यावा लागला. याबाबत सोलापूर विभागातील नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता, सर्वत्र एसटी संप सुरू असल्याचे सांगण्यात आले. 


१४६० पैकी १५० फेऱ्या 
सोलापूर विभागात सकाळी ४६४ पैकी ६९, दुपारपर्यंत ७४८ पैकी ८८, सायंकाळपर्यंत १०१५ पैकी ११४ तर रात्रीपर्यंत १२३५ पैकी १३७ तर रात्री उशिरापर्यंत १४६० पैकी १५० फेऱ्या झाल्या होत्या. १०.३४ टक्के फेऱ्या झाल्या. 

बातम्या आणखी आहेत...