आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालत्या शिवशाही बसचा टायर फुटला, प्रवाशांना रस्त्यावर जागून काढावी लागली रात्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बार्शीजवळ अंबाजोगाई आगाराच्या धावत्या शिवशाही बसचा शनिवारी रात्री 1 वाजता टायर फुटला, ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत 40 प्रवाशांचे प्राण वाचवले. पण प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांना अक्षरश: रस्त्यावरच जागून रात्र काढावी लागली. एसटी प्रशासनाने वेळीच मदत पुरवली असती तर ही दुर्देवी वेळ आली नसती अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

 

अंबाजोगाई आगाराची शिवशाही बस अंबाजोगाईवरुन पुण्याकडे निघाली होती. बार्शीजवळ बस पुढचा टायर अचानक फुटला. त्यामुळे बसचा बॅलंस बिघडला. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत हेलकावे खाणारी बस थांबवली आणि पुढील अनर्थ टळला. या बसमध्ये महिलांसह 40 प्रवाशी होते. ड्रायव्हरने बार्शी डेपोशी मोबाईलवरुन संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काही प्रवाशी मिळेल ते वाहन पकडून गेले. पण काहींना ड्रायव्हर कंडक्टर सोबतच रस्त्यावर रात्र काढावी लागली. 

बातम्या आणखी आहेत...