आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी लढणारच पण मुख्यमंत्री सांगतील त्या मतदारसंघातून- सदाभाऊ खोत, राजू शेट्टींवरही टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सदाभाऊ खोत यांच्‍या गाडीवर शनिवारी दगडफेक झाली होती. त्‍यानंतर पत्रकार परिषद घेताना राज्‍यमंत्री सदाभाऊ खोत. - Divya Marathi
सदाभाऊ खोत यांच्‍या गाडीवर शनिवारी दगडफेक झाली होती. त्‍यानंतर पत्रकार परिषद घेताना राज्‍यमंत्री सदाभाऊ खोत.

माढा (सोलापूर)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रिधाेरे (ता. माढा) येथे राज्यमंत्री खाेत यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. शेतकरी संघटनेचे नाव घेऊन राजकारण करणारे खाेत शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप यावेळी कार्यकर्त्‍यांनी केला होता. 

 

त्‍यानंतर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन राजु शेट्टी यांच्‍यावर हल्‍ला चढवला. ते म्‍हणाले, 'राजु शेट्टी स्‍वत:ला शेतकर्यांचे कैवारी समजतात. मात्र मी मंत्री झाल्यापासून त्यांचे पित्त खवळले आहे. विचारांची लढाई विचारांनी व्हायला हवी. मात्र शेट्टी यांचे विचार संपले आहेत. त्यामुळे ते आता कासाविस झाले असुन खासदारकी टिकवण्यासाठी धडपडत आहे. राजु शेट्टी च्या झुंडशाहीला मी कदापी ही घाबरणार नाही. शेतक-यांसाठी मरण आल तरी मी त्याला सामोरे जाईल. मंत्रीपद मिळाल्यानंतर मी मिरवणुका काढत फिरलो नाही. आज ही मी शेतक-यांच्या बांधांवर जाऊन त्यांच्या व्यथा जाणुन घेत त्या सोडवत आहेत. खा. शेट्टी यांना शेतक-याप्रती कसलीही आस्था राहिली नसुन  ते आपली खासदारकी कशी टिकेल यासाठी धडपडत आहेत. मीच कसा मोठा नेता आहे. यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.'

 

माढा लोकसभा निवडणुक लडविणार का? या प्रश्‍नाला उत्‍तर देताना खोत म्‍हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस जेथुन निवडणूक लढवण्‍याचा आदेश देतील तेथुन मी निवडणुक लढवेल. भाजपसोबतच राहुनच मी ही निवडणुक लढवणार आहे. मी भाजपच्याच ए.बी फार्मवर आमदार झालो आहे.' सदाभाऊ यांच्‍या या उत्‍तरावर मग आपणास भाजपचेच सदाभाऊ खोत म्हणायचे का? असे विचारले असता ते म्हणाले, 'तसे म्हणा काही हरकत नाही. मी स्वाभिमानीतुन बाहेर पडलेलो नाही तर त्यांनी मला बाहेर काढल अशी खंतही त्‍यांनी बोलून दाखवली.'

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

हेही वाचा,
राजू शेट्टी- सदाभाऊ खाेत समर्थक उतरले हातघाईवर; सदा खाेतांच्या गाडीवर दगडफेक

 

बातम्या आणखी आहेत...