आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण; केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण राबवित आहे. काँग्रेसच्या काळात क्रूड तेलावर १६ टक्के तर रिफाईन तेलावर ४४ टक्के आयातशुल्क होते, पण पंतप्रधान मोदी यांनी देशातील तेलबियांना चांगला भाव मिळण्यासाठी क्रूड तेलावर ७५ टक्के तर रिफाईन तेलावर ९० टक्के आयात शुल्क लावले आहे. कच्चे तेल, रिफाईन तेल, हरभरा, वाटाणा यावरील आयात शुल्कामध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळण्यास मदत झाली आहे. शिवाय येत्या काळात उसापासून पेट्रोल-डिझेल निर्मिती करण्यास परवानगी दिल्याचे प्रतिपादन केंद्रीय मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. 


दुधाच्या दराबाबत सांगताना श्री. पटेल म्हणाले, देशात मोठ्या दूध भुकटी पडून आले, करोडो रुपयांचा पैसा त्यामध्ये अडकला आहे. यामुळे दुधाचे दर वाढत नाहीत. दुधाची भुकटी निर्यात केल्याशिवाय दुधाला दर मिळणार नाहीत. साखरेबाबत केंद्राने धोरणात बदल केल्याने साखरेचे दर आता २९०० रुपयावर गेले आहेत. शिवाय उसाचा दर ठरविण्यात आल्याने शेतकऱ्यांना उसासाठी चांगला दर मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. 


देशाला २३० लाख मे.टन तेलाची गरज आहे, यापैकी आपण ७० लाख मे.टन तेलाची निर्मिती करतो, उर्वरित तेल आपण बाहेरून आयात करतो, यासाठी ८७ हजार कोटी रुपये खर्च होतात. पण यामुळे तेलबियाच्या किमतीवर परिणाम होतो. पण त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आयात शुल्क वाढविले. याशिवाय हरभरा, वाटाणा, मटार यावरही ५० ते ७० टक्के आयात शुल्कापर्यंत वाढ केली असल्याचे पटेल म्हणाले.

 
जातीवर नको, धोरणावर मतदान करा 
शेतकऱ्यांनी मतदान जातीवर न करता पक्षाच्या धोरणावर मतदान करण्याचे आवाहन केले. पाशा पटेल यांनी ४० मिनिटाच्या भाषणात अस्सल गावरान भाषेत संवाद साधून शेतकऱ्यांची मने जिंकून घेतली. तुमच्या मायची शपथ घेऊन खर सांगा... माझं खोटं असेल तर तुमचं पायताण, माझ डोकं अशी शब्दफेक केली. 

बातम्या आणखी आहेत...