आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांडपाण्यातून गायरान जमिनीवर उसाचे पीक; प्राप्त उत्पन्नातून निराधारांसाठी विकास योजना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील ग्रामस्थांनी अस्वच्छतेची समस्या कायमचा मिटवण्याचा निर्धार करून सांडपाण्याचे नियोजन केले. गटारीचे सांडपाणी गायरान जमिनीत आणून १ एकर उसाची लागवड केली. गेल्या  ५ वर्षांपासून त्या सांडपाण्यावर पोसलेला ऊस कारखान्यात गाळपासाठी पाठवला जातो. यामुळे ग्रामस्वच्छता तर झालीच, शिवाय गावच्या उत्पन्नात भर पडली.  


सोलापूूर-मंगळवेढा मार्गावरील ब्रह्मपुरी हे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव. एेतिहासिक वारसा लाभलेल्या या गावाच्या शिवारातून पंढरपूरच्या दिशेने भीमा नदी वाहते. नदीपात्रालगत माचणूरचे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आहे. गावात सर्वत्र उघड्या गटारींमुळे अस्वच्छता वाढली. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्याचेही प्रश्न निर्माण होत. मंदिर मार्गावरून गटारीचे सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत. अस्वच्छतेच्या प्रश्नावर ग्रामसभेत चर्चा झाली. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य (स्व.) सर्जेराव पाटील यांच्यासह काहींनी सांडपाण्याचे नियोजन करून ते पिकासाठी वापरण्याबाबत चर्चा झाली. तत्कालीन ग्रामसेवक एस. बी. शिंदे यांनी ती प्रत्यक्षात आणली. गावालगत दीड एकर गायरान क्षेत्रात उसाची लागवड करण्याचे ठरवण्यात आले.

 

बहुतांश गावकरी स्वत: ऊस बागायतदार. ग्रामपंचायतीने गायरानातील काटेरी झुडपे काढली. उसासाठी एक एकर रान तयार केले. सन २०११-१२ या वर्षात पहिल्यांदा त्या ठिकाणी उसाची लागवड केली. ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी उसाला पाणी सोडत. गावकऱ्यांनी ऊस उत्पादन व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन त्यांनी केले. पहिल्याच वर्षी एकरात तब्बल ६१ टन ऊस निघाला. ९२ हजार रुपयांचे उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळाले. दरम्यान,  आता सांडपाणी थेट पिकास देण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच मनोज पुजारी यांनी सांगितले. 

 

पंचायत राज समितीने केला कार्याचा गौरव  
पंचायत राज समिती यंदा फेब्रुवारी महिन्यात सोलापूरच्या दौऱ्यावर आली होती. त्या समितीच्या सदस्यांनी ब्रह्मपुरी गावाने राबवलेल्या अभिनव उपक्रमाची प्रत्यक्षात पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामपंचायतीने राबवलेला उपक्रम राज्यभरात आदर्शवत असल्याचा गौरव समितीच्या सदस्यांनी केला.  

 

उत्पन्नातून विधायक कामे  
पहिल्या वर्षीच्या उत्पन्नासह शासन निधीतून गावात बंदिस्त गटारी बांधल्या. गावालगत मोकाट जनावरांचा उपद्रव थांबवण्यासाठी दुसऱ्या उत्पन्नातून गायरान जमिनीस तारेचे संरक्षक कुंपण घातले. उसाच्या उत्पन्नातूनच शाळाखोलीची दुरुस्ती, रंगरंगोटी करून भिंतीवर शैैक्षणिक माहिती रेखाटल्या. अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र गॅस कनेक्शन, शाळांमध्ये अग्निशमन संच, िडजिटल शाळा केली. उसाच्याच उत्पन्नातून एका अपंगास वैद्यकीय उपचारांसाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...