आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवदान देणारे सरकार नाहीच, हे तर सामान्यांची हत्या करणारे; सुशीलकुमार शिंदे यांची घणाघाती टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- देशभरात सर्व समाजघटकांमध्ये असहिष्णुता वाढली आहे. दलित, अल्पसंख्याकांवर वाढते हल्ले, हत्या वाढत असून, सध्याचे सरकार सर्वसामान्यांना जीवदान देणारे नसून, त्यांची हत्या करणारे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप सरकारवर टीका केली. 


काँग्रेसतर्फे सोमवारी देशभरात सामाजिक समता, बंधुता, शांततेसाठी उपोषण करण्यात आले. सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे चार हुतात्मा पुतळा परिसरात झालेल्या उपोषणात श्री. शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, भारत भालके, अॅड. रामहरी रूपनवर, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी आमदार दिलीप माने, दत्ता सुरवसे, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, युवक लोकसभा अध्यक्ष सुदीप चाकोते, अंबादास करगुळे आदी सहभागी झाले. 


सकाळी रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून काँग्रेसची नेतेमंडळी उपोषणस्थळी आली. चार हुतात्म्यांना अभिवादन करून सकाळी दहा वाजता आंदोलन सुरू केले. पुतळ्यांच्या मागील परिसरात मंडप उभा करण्यात आला होता. तिथे गाद्या, पंखे आदी सोयी केल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत श्री. शिंदे, आमदार शिंदे यांच्यासह निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते संपूर्ण वेळ बसून होते. 


उपोषणानंतर बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपने सर्वसामान्यांची दिशाभूल केली आहे. सामाजिक समतोल ढासळला असून, धर्मनिरपेक्ष समाज उभारणीसाठी काँग्रेस सदैव प्रयत्नशील अाहे, असे त्यांनी सांगितले.

 

उपोषणस्थळी देशमुखांची दुसरी भेट 
२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला उज्ज्वला शिंदे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने सुशीलकुमार शिंदे सोलापुरात परतले नव्हते. त्यांनी परतावे म्हणून त्यांच्या चाहत्यांनी चार हुतात्मा पुतळा परिसरात उपोषण केले होते. त्यावेळी निवडून आलेले भाजपचे खासदार सुभाष देशमुख यांनी हजेरी लावली होती. या प्रसंगाची आठवण सोमवारी उपोषणस्थळी अनेकांनी काढली. 

बातम्या आणखी आहेत...