आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर तापले; पारा ४३.५ अंशावर; चंद्रपूर सर्वांत उष्ण, पारा ४६.४ अंश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी झाली. पारा ४३.५ अंंश सेल्सियसवर पोहोचला. या आठवड्यात दररोज तापमान वाढतच आहे. त्यामुळे सोलापूरकरांना रखरखत्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. 


२५ रोजी ४२.१, २६ रोजी ४१.६, २७ रोजी ४१.४, २८ रोजी ४२.४ आणि २९ रोजी ४३.५ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान चंद्रपूर (४६.४ अंश) येथे नोंदवले गेले. सोलापूरमध्ये गेल्या आठवडाभरापासून दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढतच असल्यामुळे उन्हापासून बचाव व्हावा म्हणून सोलापूरकर तांेडाला पांढरा रुमाल, टोपी घालणे, गॉगल्स वापरत आहेत. थंड पेयचा वापरसुद्धा करत आहेत. 


यामुळे उष्णता जास्त
कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे उष्ण वारे मैदानी प्रदेशात प्रवेश करत आहेत. परिणामी विदर्भातील उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. येत्या दोन दिवसांतही हवामान कोरडे राहणार असल्याने उष्णतेचा परिणाम टिकून राहणार आहे, असे आयएमडीने स्पष्ट केले. 


राज्यातील तापमान 
औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.७, चंद्रपूर ४६.४, ब्रह्मपुरी ४६, वर्धा ४५.८, नागपूर ४५.२, अकोला ४४.७, अमरावती ४३.८, बुलढाणा ४१.२, गोंदिया ४२.५, वाशीम ४२.६, सोलापूर ४३.५, जळगाव ४३.४, सातारा ४०, सांगली ३९.५, नाशिक ३८.१, पुणे ३९.१, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३३.२, मुंबई ३३.८ 

बातम्या आणखी आहेत...