आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलीसाठी नेणाऱ्या नऊ गोवंशाची सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलिसांना गस्त करताना मिळालेल्या माहितीवरून राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक सहावरील जामठी फाट्याजवळ पीकअपचा पाठलाग करून नऊ गोवंशांची सुटका केली. तसेच गाडीसहीत दोन आरोपींना अटक करून माना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. ही कारवाई आज, २४ जानेवारीला सकाळी ६ च्या सुमारास केली.

 

चिंचखेड फाटा येथे नाकाबंदी करून एमएच ३७ जे १७३२ क्रमांकाच्या पिकअप गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिकअप वाहन न थांबता सुसाट वेगाने मूर्तिजापूरकडे निघाले. माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार घुगे, पोलिस उपनिरीक्षक चंदू पाटील, पोहेकाॅ नलावडे, रामेश्वर कथलकर, राजेश्वर सोनवणे, सचिन दुबे, चालक प्रवीण ठाकरे, पोलिस मित्र रामभाऊ वानखडे यांनी गाडीचा पाठलाग केला.


जामठी फाट्याजवळ गाडीला अडवण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी पिकअपचा चालक मधुकर सावळे, वय ५० वर्षे, रा. अशोक नगर, मंगरूळपीर जि. वाशीम व शेख हुसेन शेख मुश्ताक कुरेशी, वय १७ वर्षे रा. मच्छी मार्केट, अकोला यांना अटक केली. नऊ जनावरे व गाडीसह २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...