आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 दिवसांपूर्वी नोकरीस लागलेल्या युवकाचा रेल्वे खांबावरून पडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वेच्या विजेच्या खांबावरून तोल जाऊन पडल्याने नीलेश अशोक कोळी (वय ३०, रा. कुर्डुवाडी, नेमणुकीचे ठिकाण वाडी, कर्नाटक) या युवकाचा मृत्यू झाला. नीलेश हा त्याच्या वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मदतनीस म्हणून नोकरीस लागून केवळ आठच दिवस झाले होते. कोणतेही प्रशिक्षण पूर्ण करून न घेताच त्याला कामावर जुंपण्यात आल्याने हा जीवघेणा अपघात घडला. गुरुवारी ही सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली.


नीलेश खांबावर चढल्याच्या दहा मिनिटांतच सुमारे वीस फुटांवरून पडला. त्यांच्या पाठीला व मणक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी वाडी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला सोलापूरला नेण्याचा सल्ला दिला. त्याला चेन्नई मेलने त्याला सोलापूरला आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. अक्कलकोटपर्यंत तो जिवंत होता असे सांगण्यात आले.

 

चार महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते निधन

नीलेशचे वडील रेल्वे संरक्षक दलात कामाला होते. एका आजारात त्यांचे चारच महिन्यांपूर्वी निधन झाले. दरम्यान, घडलेली घटना गंभीर आहे. चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल. यासाठी समिती नेमू, असे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व्ही. के. नागर यांनी सांगितले.
 

कदाचित नीलेश वाचला असता
खांबावर चढताना नीलेशकडे हेल्मेट, सेफटी बेल्ट आदी सुरक्षेचे उपकरण नव्हते. एरव्ही २१ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, नीलेशला असे प्रशिक्षण दिले नाही. तर वाडीच्या डॉक्टरांनी ३७ किमीवर असलेल्या गुलबर्गाऐवजी दीडशे किमी लांब असलेल्या सोलापूला नेण्याचा सल्ला दिला.

बातम्या आणखी आहेत...