आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत चोरी करणाऱ्या हरियाणाची गँग जेरबंद, सोलापूर अारपीएफची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवी दिल्ली -आग्रा रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांत चोरी करून सिकंदराबाद येथे जाणाऱ्या हरियाणा येथील चार चोरांना मुंबई -हैदराबाद एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून सोलापूर आरपीएफने शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई दोन दिवसांपूर्वी सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान करण्यात आली असून त्यांच्याकडून अडीच लाख रोख रक्कम तर ८ मोबाइल जप्त करण्यात आले.

 

सुरेन्द्र कुमार मुन्शीराम (वय ३६,रा. साेरखी, ता. हंसी, जि. हिसार), जगदीश चरणदास (वय ३८, रा. लोहारी राधे, ता.नारोंद, जि.हिसार), रामदिया दीपचंद ऊर्फ विकास गुप्ता (वय ३८, रा. साेरखी, ता. हंसी, जि. हिसार), सुरेश कुमार सभुसिंह ऊर्फ सौरभ सिंह (वय ३६, रा.पेठवाल, ता. नारोंद, िज.हिसार) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

 

सोलापूर रेल्वे स्थानकावरील खबऱ्यांकडून आरपीएफच्या गुप्त शाखेला परराज्यातील टोळी मुंबई -हैदराबाद एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुप्त शाखेचे अधिकारी व कर्मचारी त्याच वेळी रेल्वेत गस्त घालायला सुरुवात केली. आरपीएफ यांना संशय येऊ नये चोरट्यांनी थ्री टिअरचे आरक्षित तिकीट काढले होते. काही मिनिटांतच आरपीएफ यांना त्याचा छडा लागला. बी ३ मधून चार संशयित प्रवास करत असल्याचे कळल्यानंतर रेल्वे पाेलिसांनी बी ३ डब्याकडे मोर्चा वळविला आणि चौघांना ताब्यात घेतले. सुरेद्र कुमार मुन्शीराम हा गँगचा म्हाेरक्या असून त्यांनी देशभरात विविध ठिकाणी रेल्वेत चोरी केली असल्याची कबुली दिली. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश कुमार, सचिन मिस्कीन, ए. जी. रुपनर, एन. टी. चौलवाड, शशिकांत गुरव आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...