आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मपुरी येथे एटीएम फोडून पावणेदोन लाख रुपयांची चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- ब्रह्मपुरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून चोरट्यांनी एक लाख ७१ हजार ६०० ची रोकड लुटली. शुक्रवारी (दि. २५) पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार घडला. 


याप्रकरणी चॅनेल राेकड व्यवस्थापक अमोल अरुण पवार (वय ३२) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. महाराष्ट्र बँकेचे मंगळवेढा - सोलापूर   रस्त्यालगत एटीएम आहे. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र, मध्यरात्री कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी हे एटीएम फोडले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधील रोकड हाताळणीचे काम इलेक्ट्रॉनिक कॅश टेलिकम्युनिकेशन कंपनीकडे आहे. १९ मे रोजी रोहित जाधव यांनी एटीएममध्ये १६ लाखांची रोकड भरली होती. शुक्रवारी सकाळी जाधव यांनी फोनवरून एटीएम मशिन फोडल्याचे सांगितले. रोकड तपासल्यावर एक लाख ७१ हजार ६०० रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले. यात १०० रुपयांच्या एक, ५०० रुपयांच्या ३३५ आणि २००० रुपयांच्या दोन नोटांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे तपास करत आहेत. 


फुटेजमध्ये चेहरे अस्पष्ट, यापूर्वीही फोडले होते हे एटीएम 
एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजमध्ये चोरट्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत आहेत. यापूर्वीही हे एटीएम चोरट्यांनी फोडले होते. मात्र, त्यावेळी रोकड चोरीला गेली नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...