आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक खाते हॅक करून मोदींच्या हत्येची धमकी! सोलापूरचा 'तो' तरुण निर्दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर, माढा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसंदर्भातील कटाचा मेसेज टेंभुर्णीच्या बापू राजगुरू या तरुणाच्या फेसबुक खात्यावर प्रसिद्ध झाला. त्यावरून त्याला दिल्ली व गाझियाबाद पोलिसांनी चौकशीसाठी शनिवारी रात्री ताब्यात घेतले होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा त्याचा या घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचे फेसबुक अकाउंट हॅक करून गाझियाबादच्या तरुणाने हा मजकूर टाकल्याचे समोर येत आहे. 


माढा तालुक्यातील अकोले खुर्द (गार अकोले) गावातून बापू कुबेर राजगुरू (वय २८) या तरुणास उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसाच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. रविवारी अधिक चौकशीसाठी गाझियाबाद पोलिस त्याला घेऊन गेले. 


राजगुरू हा मूळचा येवती येथील (ता. मोहोळ, जि. सोलापूर) रहिवासी असून तो अनेक वर्षांपासून अकोलेमधील विनोद पाटील यांच्याकडे कामास आहे. त्याच्या फेसबुक अकाउंंटवरून मोदींच्या हत्येच्या कटाचा व धमकीचा मेसेज प्रसिद्ध झाला. सायबर सेल पोलिसांनी माढा तालुक्यातून शनिवारी राजगुरूला ताब्यात घेतले. दरम्यान, राजगुरू याचे फेसबुक खाते हॅक करून धमकी देण्यात आल्याचे गाझियाबाद पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला फोनवरून सांगितले. धमकी देणारा राजगुरू नसून ती व्यक्ती उत्तर प्रदेशमधीलच आहे. त्याची चौकशी पूर्ण होताच सोडले जाईल, अशी माहिती टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी दिली. 


चौैकशी करून सोडून देण्याची तयारी सुरू 
या घटनेशी प्रत्यक्ष राजगुरू या तरुणाचा काही संबंध नसल्याची माहिती गाझियाबाद पोलिसांनी दिली आहे. त्याचे फेसबुक खाते हॅक करून उत्तरप्रदेश येथील तरुणाने हा धमकीचा मेसेज पाठविला आहे. त्यामुळे टेंभुर्णीच्या तरुणाची चौकशी करून सोडून देण्याची तयारी सुरू आहे.
- वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक 

बातम्या आणखी आहेत...