आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांसह आंबा धोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - सध्या दिवसभर ढगाळ आणि रात्री थंडीमुळे आंबा, द्राक्ष बागांसह रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थंड हवेच्या लाटेमुळे हवेतील बाष्प एकत्र झाले आणि त्यांची ढगं बनल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे यांनी सांगितले. जिल्ह्यासह तालुक्यात आठवड्यापासून थंडीचा जोर ओसरला आहे. बुधवारपासून (दि.७) वातावरणात अामूलाग्र बदल होऊन झाला. ज्वारीसह हरभरा व गव्हाची पेरणी झाली. वातावरणाचा हरभरा, गहू पिकांना फटका बसू शकतो. ज्वारीचे उत्पन्नही घटण्याचा धोका आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावरील मोहर जळत आहे.

 

रोग नियंत्रणासाठी फवारणी : ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३ मिलि इमोडाक्लोप्रीड, भरी रोगासाठी हेक्झाकोमॅझॉल १० लिटर पाण्यात ५ मिलि, करपा रोगासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी करावी. गव्हावरील तांबेरा रोगासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम मॅकोझेनची फवारणी करावी. फवारणीवेळी मास्कचा वापर करून दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...