आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाचे आज चक्का जाम आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनाने ३६ हजार जागांची भरती करू नये, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. माऊली पवार यांनी ही माहिती दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मंजुरी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह उभारण्यासाठी जागा, शेतकऱ्यांना हमीभाव आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. 


मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे आणि आश्वासनांची पूर्ती करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी तुकाराम मस्के, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, श्रीकांत घाडगे, दिलीप कोल्हे, दास शेळके, लहू गायकवाड, योगेश पवार, किरण पवार, राम जाधव, अभिंजली जाधव, लता ढेरे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
या आहेत मागण्या 
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा, पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून तसा कायदा करावा, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत, आदी प्रमुख मागण्यांचा समावेश निवेदनात आहे. 

बातम्या आणखी आहेत...