आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा व्यापाऱ्याला सात लाखांना फसवले, दोघांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सात लाख किमतीचे कांदे मागवून घेऊन त्याचे पैसे न दिल्यामुळे तामीळनाडूच्या दोघांवर जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे. संजीव मिठ्ठा (रा. साखरपेठ) यांनी तक्रार दिली अाहे. मार्केट यार्डात त्यांचे संजोग ट्रेडर्स नावाचे दुकान अाहे. तीस जानेवारी ते चोवीस मे २०१८ या कालावधीत हा   प्रकार घडला अाहे. 


प्रशांत व त्याची सहकारी नित्या असे दोघेजण मिठ्ठा यांच्याकडे फोनवरून व मागणी पत्र पाठवून कांद्याची नोंदणी केली. त्यानुसार २६ हजार ४४० टन कांदे पाठवून दिले. त्याची किंमत ७ लाख ३ हजार रुपये होते. कालांतराने पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. कोईमतूर येथे विश्वेश्वरा ट्रेडर्स नावाचे दोघांचे फर्म अाहे. दोघांनी मिळून अार्थिक फसवणूक केल्यामुळे हा गुन्हा दाखल अाहे. 

बातम्या आणखी आहेत...