आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहप्रवाशाच्या मोबाइलवरून वडिलांना केला फोन, दोघी अडकल्या पोलिसांच्या जाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- धुना व वसन यांनी शुक्रवारी पहाटे अाई, बहीण व भावाचा खून केला. बसस्थानकारून अंबाजोगाईला गेल्या. तिथे धुनाचा एक मित्र राहतोय. त्याला भेटल्यानंतर हकिकत सांगितल्यानंतर त्याने येथून दोघींना जाण्यास सांगितले. दोन दिवस अंबाजोगाईतच राहिल्या. तिथून रविवारी सकाळी तुळजापूरला येताना वडिलांना फोन केला. त्या नंबरवरून तपास करताना दोघींचा ठावठिकाणा कळला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. 


धुना व वसन दोघी बहिणी. जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण. वडील रणछोड यांचा गायी, म्हशी पशुपालकाचा व्यवसाय. हा परिवार तीस वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात राहतोय. ते मूळचे गुजरातमधील अाहेत. धुना, वसन, लाकी असे तीन मुली. मोफा हा एक मुलगा. पत्नी हतयबाई असा परिवार. वीस म्हशी, पाच गायींचे ते पालन करतात. सिद्धनाथ कारखाना परिसरातील मैदानात हा परिवार झोपडी टाकून राहतोय. कारखाना चालू असताना अंबाजोगाईतील एका ऊसतोड तरुणासोबत धुनाची अोळख झाली होती. धुना व वसन यांच्याकडे गायी, म्हशीचे संगोपन करणे, दूध काढणे, शेणखत काढण्याची व घरातील स्वयंपाक, धुणी भांडी करण्याची जबाबदारी होती. एवढे करून जर कामात कुठे चूक झाली की भाऊ, अाई मारहाण करायचे. बहीण व वडीलही शिवीगाळ करायचे. भावाचा प्रचंड त्रास होता. दोघींना मारण्यासाठी त्याने विविध प्रकारच्या काठ्या अाणून ठेवल्या होत्या. नियमीत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे पोलिस सांगतात. 


या पथकाने केली कारवाई 
अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक अभय डोंगरे, एलसीबी पीअाय िवजय कुंभार, किशोर नावंदे, सहायक निरीक्षक उमेश धुमाळ, फौजदार बाबूराव म्हेत्रे यांच्यासह हेमंत भंगाळे, नारायण गोलेकर, मल्लिनाथ चडचणकर, संदीप काशिद, संभाजी खरटमल, विजयकुमार भरले, मारुती रणदिवे, विवेक सांजेकर, सचीन वाकडे, दिलीप राऊत, अनिता काळे, रवी माने, बाळू चमके, लालसिंग राठोड, अासीफ शेख, सागर शिंदे, अमोल गावडे, सचिन गायकवाड, गुंडप्पा सुरवसे, इस्माइल शेख. या पथकाला बक्षीस देण्यात अाले. तसेच बसचालक -वाहक सूरज डोईफोडे, बी. व्ही. मुंडे यांच्यासह पुणे पोलिसांची साथ मिळाली. 


शुक्रवारीच क्ल्यू मिळाला होता 
धुना व वसन या दोघीजणी सोलापूर बस स्थानकावरून बाहेर गावी गेल्याचे बसस्थानकावरील सीसीटीव्हीत आले होते. त्यावरून त्यांचे अपहरण झाले नसल्याचे समाेर आले होते. त्या कुठे गेल्या आहेत. या ट्रॅकवर पोलिस होते. पण रविवारी वडिलांना फोन केल्यानंतर दोघींचा ठावठिकाणा समोर आला. शुक्रवारच्या क्ल्यू प्रमाणे दोघींचा शोध घेत होते. त्या अगोदरच रविवारी त्या दोघी पोलिसांच्या जाळ्यात आल्या. 

 
अंबाजोगाई ते पुणे प्रवास 
शुक्रवार व शनिवार दोन दिवस मुक्काम अंबाजोगाईत. रविवारी सकाळी तुळजापूरकडे निघाल्या. काही अंतरावर अाल्यानंतर बसमधील सहप्रवाशाचा मोबाइलवरून वडिलांना फोन करून अाम्हला कुणीतरी पळवून नेत असल्याचे सांगितले. वडिलांनी तो नंबर पोलिसांना सांगितला. त्यावरून मुुलींचे लोकेशन तुळजापुरात समजले. तेथील बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यांचे चेहरे कैद झाले होते. चौकशीत दोघे तुळजापूर-पुणे या बसमधून एमएच १४ बीटी १०२६ गेल्याची माहिती मिळाली. त्या बसमधील चालक व वाहकाचे फोन नंबर मिळवले. वाहकाला संपर्क करून घटनेची माहिती िदली. दोन्ही मुलींचे फोटो व्हाॅट्सअॅपवर टाकले. त्याच दोन मुली असल्याचा वाहकाकडून निरोप दिला. दोघींचे शूटिंग करून पोलिस अधिकाऱ्यांना व्हाॅट्सअॅप केला. खात्री झाल्यानंतर बस थेट यवत पोलिस ठाण्यात नेण्याची सूचना देण्यात अाली. पुणे पोलिस अधीक्षक सुवेज हक यांना पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी माहिती दिल्यानंतर सूत्रे हलली. सोलापूर पोलिसांनी सोमवारी पहाटे त्यांना सोलापुरात अाणल्यानंतर चौकशीत गुन्ह्याचा छडा लागला. 


अाणखी काही मुद्दे तपासणार 
अाज दीडतास चौकशीत काही मुद्दे समोर अालेत. दोघींनी खून केल्याची कबुली दिली. अाणखी काही धागेदोरे मिळतात का? याची चौकशी होईल. तपासात काही विशिष्ट गोष्टी समोर अाल्यास त्याचीही सत्यता पडताळू. मुलींशी अाणखी संवाद साधून चौकशी केली जाईल. 
- वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक 

बातम्या आणखी आहेत...