आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योगासन स्पर्धेत तृप्ती अावताडेला सुवर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बेयॉन्स हॉवर्ड अर्जेंटिना (दक्षिण अमेरिका) येथे सुरू असलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत येथील तृप्ती रमेश अावताडे हिने सुवर्ण पदक पटकावले. प्रशिक्षक सुभाष उपासे यांनी ही माहिती दिली. 


तिने १७ ते २१ वर्षे वयोगटात वैयक्तिक आसन प्रकारात ही कामगिरी केली. तृप्तीने सोलो प्रकारातही रौप्य पदकाची कमाई केली. सोलाेमध्ये ठरावीक मिनिटात संगीताच्या तालावर वेगवेगळ्या अासनांची बहारदार प्रात्यक्षिके दाखवत ही कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत तृप्तीने सोलापूरला पहिलेच सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. यापूर्वी रक्षा गोरटे हिने रौप्यची कमाई केली होती.


कामगिरीचा आलेख उंचावला 
तप्तीने दोन आशियाई स्पर्धेत भाग घेऊन एक रौप्य व एका कांस्यची कमाई केली. जागतिक स्पर्धेत तिने प्रथमच भाग घेत सुवर्णची कमाई करीत आपल्या कामगिरीचा आलेख उंचावला. 
- सुभाष उपासे, प्रशिक्षक 

बातम्या आणखी आहेत...