आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीचवर्षीय बालकाचा पित्यासह खून; सावत्र आईनेच हत्या केल्याचे उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- कुंभेजमध्ये अडीचवर्षीय बालकाचा वडिलासह सावत्र आईने खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. करण सुनील काळे असे खून झालेल्या बालकाचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील सुनील लक्ष्मण कोळी आणि सावत्र आई गीता सुनील काळे (रा. नांदगाव, जि. रायगड) यांना पोलिसांनी अटक   केली. त्यांना येथील न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली. दरम्यान, संशयितांनी खून केल्याची कबुली दिली. 


हे दोघे व दिनेश कोळी असे तिघे जण कुंभेज गावातील पोपट आलदर यांच्याकडे बाभळीपासून कोळसा करण्यासाठी अनेक दिवसापासून कामाला होते. २१ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुंभेज शिवारातील राहुल धनाजी पाटील यांच्या शेतात अडीचवर्षीय बालकाचा मृतदेह आढळला होता. पोलिस पाटील धुळा दादा भिसे यांनी पोलिसांत खबर दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात बालकाचा गळा दाबून खून केल्याचे आढळले. त्यानुसार नंतर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु बालकाची ओळख पटली नव्हती. दरम्यान, यातील संशयित सुनील, गीता आणि दिनेश कोळी हे पोपट आलदर यांच्याकडे बाभळीपासून कोळसा बनवण्याच्या कामावर होते. ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत खून झालेल्या बालकाला पाहिले होते. ग्रामस्थांच्या सांगण्यावरून बुधवारी पोलिसांच्या पथकाने मोबाइल लोकेशनच्या मदतीने नांदगाव येथे जाऊन संशयित सुनील, गीता यांना ताब्यात घेतले. येथे आणल्यानंतर त्यांनी गुरुवारी पोलिस तपासात आपणच करण याचा खून केल्याची कबुली दिली. तसेच गीता ही करणची सावत्र आई असल्याचेही उघड झाले. त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. यात सरकार पक्षातर्फे अॅड. विशाल सक्री, संशयितांतर्फे अॅड. हरिश्चंद्र कांबळे यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस तपास करत आहेत. 


मात्र, खुनाच्या कारणाचा उलगडा झालेला नाही : पोलिस 
संशयीत सुनील व गीता या दांपत्याने खुुनाची कबुली दिली आहे. मात्र, पोलिस तपासात खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. बालक करण हा मतिमंद होता. त्यामुळे त्यांनी खून केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...