आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक पवार खून, दोघे सुपारी किलर अटकेत; मोक्का न्यायालयाने दिली ११ मेपर्यंत पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- येथील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. दादा उर्फ पिराजी भगवान लगाडे (रा.अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) आणि दिगंबर संदेश जानराव (लऊळ ता.कुर्डुवाडी, जि.सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. पुणे येथील मोक्का न्यायालयाने या दोघांनाही ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या आता २१ पर्यंत पोहोचली आहे. 


गुढीपाडव्या दिवशी १८ मार्च रोजी नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या झाडून आणि सत्तूरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित प्रमुख संशयित अक्षय उर्फ बबलू सुरवसे याला साथीदारांसह ठाणे येथे अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढत गेली. त्यामुळे पोलिसांनी १२० (ब) हे कलम वाढवले. या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून येथील भाजपचा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अकुंशराव उर्फ सरजी यालाही अटक केली. या गुन्ह्यातील सर्व संशयितांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. पिराजी लगाडे , दिगंबर जानराव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही सुपारी किलर असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांना पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...