आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी धरणात दोन दिवसांत दोन टीएमसी पाणी वाढले; दौंड येथून सहा हजार १७५ क्युसेक विसर्ग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेंभुर्णी- उजनी पाणलोट क्षेत्रात पावसामुळे उजनी जलाशयाची पाणीपातळी हळूहळू वाढत अाहे. दौंड येथील विसर्गात वाढ होऊन ६ हजार १७५ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. उजनी धरणात पाणीपातळी वजा १३ टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांत दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. 


९ जुलैपासून उजनीत पाणी यायला लागले असून १२०० क्युसेक विसर्गाने पाणी येत होते. त्यात वाढ होऊन बुधवारी ११ रोजी दौंड येथून ६ हजार १७५ क्युसेकने पाणी येत आहे. हे उजनी परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी असून, अद्याप उजनीच्या वरील धरणातून पाणी सोडण्यात आले नाही. सध्या उजनी धरणात ५६. ७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 


गेल्या दोन दिवसात दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामुळे मृतसाठ्यातून उपयुक्त साठ्यात लवकरच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपयुक्त पाणीसाठा वजा ६.९५ टीएमसी तर एकूण टक्केवारी १२. ७१ टक्के झाली आहे. एकूण पाणीसाठा ४९८.९९० मीटर, एकूण पाणीपातळी १६०५.९० दलघमी उपयुक्त पाणीपातळी वजा १९६.९१ दलघमी आहे.

बातम्या आणखी आहेत...