आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरसौष्ठवपटू समी जमखंडीसह दोघे अाळंदजवळ अपघातात ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर, आळंद- सोलापूरचे दोन तरुण आळंदजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात ठार झाले. त्यात प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू अ. समी मीराशमना जमखंडीचा (वय २५) समावेश आहे. मोहिब महिबूब कोतकुंडे (वय २५) हा तरुणही प्राणाला मुकला. 


जमखंडीसह सहा जण सोलापुरातून कारने कलबुर्गी येथे मित्राच्या लग्नाला गेले होते. हिरोळी गावाजवळील वळणावर स्पीड ब्रेकरवर कारच्या पुढे वेगात चाललेल्या ट्रकने (एम.एच.२५ बी.९४२८) अचानक वेग कमी केला. त्यामुळे कारची मागून धडक बसली. कारचा पुढचा भाग ट्रकच्या मागच्या भागात घुसला. त्यात जमखंडी व कोतकुंडे जागीच ठार झाले. शुक्रवारी रात्री १० ला रस्त्यावरून जात असलेल्या सिध्दाराम सरडगी या दुचाकी स्वाराने मादनहिप्परगा पोलिस ठाण्याला माहिती दिली. चौघांपैकी एकावर (दौलताबादकर जुनैद - रा. रविवार पेठ) सोलापुरात उपचार सुरू आहेत. तिघांना किरकोळ जखमा झाल्या अाहेत. जोडबसण्णा चौक जमखंडी पुलाजवळ राहणारा अ. समी मीराशमना जमखंडी व बुधवार बाजार महिबूब हाॅटेलजवळ राहणारा मोहिब महिबूब कोतकुंडे यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार झाले. 


समी डी.फार्मसी पदवीधर 
अ. समी हा डी.फार्मसी पदवीचे शिक्षण घेत होता. त्याच्या मागे अाई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार अाहे. वडिलांचे घराजवळच मीरा अाॅटो म्हणून टायर दुकान अाहे. त्याला शरीरसौष्ठवची अावड होती. सकाळी व सायंकाळी ३-३ तास व्यायाम करायचा. 


मोहिबचा २६ फेब्रुवारीला होता वाढदिवस 
मोहिब हा एमअार होता. वडील सोशल काॅलेजात िलपिक अाहेत. अाई गृहिणी असून दोन भाऊ अजून शिक्षण घेत अाहे. तिघेजण मिळून अौषध डिस्ट्रिब्युटर घेणार होते. मोहिबचा २६ फेब्रुवारीला वाढदिवस होता. 


'महाराष्ट्र श्री'चे स्वप्न अधुरे 
समीला व्यायामाची अावड. शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक विजय मिळवले. महाराष्ट्र श्रीत (महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धा) पदक मिळविण्याचे स्वप्न होते. पण, अाज तो अाम्हाला सोडून गेला. घरात सगळ्यांचा लाडका होता, अशा अाठवणी सांगताना समीचे वडील मीराशमना जमखंडी गहिवरले. 


समी हा भागवत श्री स्पर्धेसाठी तयारी करीत होता. नऊ फेब्रुवारीला सोलापुरात स्पर्धा होती. सूर्या व मोहोळकर जीममध्ये तो सराव करत होता. जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र श्री स्पर्धेत त्याने अनेक पदके मिळवली. 
- प्रमोद काटे, सचिव, शरीर सौष्ठव संघटना

बातम्या आणखी आहेत...