आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATMमध्ये मदत घेताना सावध राहा, 3 वेगवेगळ्या प्रकारात सुमारे साडेपाच लाखांना गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना काहीवेळा दुसऱ्यांची मदत घेतली जाते. अशा वेळी विचार करा, अापली फसवणूक तर होणार नाही ना? गरज पडलीच तर सुरक्षा रक्षकाची घ्या. रांगेत थांबलेल्या व्यक्तीची मदत घेताना सावध राहा. अशा प्रकारे मदतीच्या बहाण्याने फसवणुकीचे प्रकार वाढत अाहेत.

 

अनेक एटीएम सेंटरला सुरक्षा रक्षक नाहीत. असले तर नुसते बसून असतात. एकाच व्यक्तीला अात सोडणे. दोघांना अात न सोडण्याच्या नियमाची अंमलबजावणी त्याने केली पाहिजे. दोन मशिन असतात तिथे दोनच व्यक्तींना अात सोडले पाहिजे. अनेकदा तीन- चारजण थांबून असतात. एटीएममध्ये अशा घटनांना स्वत: ग्राहक व बँकाचे एटीएम सेंटरचे व्यवस्थापनही जबाबदार अाहे, असे म्हणावे लागेल.

 

सावधानतेच्या काही टिप्स : अाॅनलाइन बँकिंग अथवा एटीएमचा वापर करीत असाल तर एसएमएसचा अलर्ट सुविधा घ्या. सेंटरमध्ये पैसे काढायला गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ नका. दुसरी व्यक्ती अातच थांबण्याचा प्रयत्नात असेल तर त्याला बाहेर थांबण्याची विनंती करा. शंका अाल्यास पोलिसांना फोन करा. अोटीपी, कोड नंबर विचारणा झाल्यास प्रतिसाद देऊ नका. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कॅन्सल बटन दाबा.

 

या अाठवड्यातील काही ठळक घटना
घटना क्रमांक १ : चार दिवसांपूर्वी जुना बोरामणी नाका भागातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना एका व्यक्तीने माजी सैनिक अंबाजी बोडा यांचे कार्ड काढून घेऊन त्या अाधारे अाॅनलाइन खरेदी करत सुमारे १ लाख ३० हजारांचा गंडा घातला. एमअायडीसी पोलिसांत गुन्हा दाखल अाहे. बोडा यांनी ३० हजार रुपये काढून अापले कार्ड मशिनवरच ठेवले. नंतर चोराने त्यांचे कार्ड घेतले. बोडा पैसे काढताना तो तरुण अातच होता. त्यामुळे त्याने कोड दाबताना पाहिले होते.
घटना क्रमांक २ : शांतकुमार पुजारी यांच्याकडून अोटीपी नंबर विचारून अाॅनालइन शाॅपिंग करण्यात अाली. त्यांच्या फायनान्स कार्डवरून ५० हजारांची खरेदी करून फसवणूक झाली अाहे.
घटना क्रमांक ३ : डाॅ. महेश वसगडे यांचे अार्थिक व्यवहारातून काहीजणांनी एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. कोड विचारून तीन लाख ६२ हजारांची फसवणूक केली अाहे.

 

कोणतीही बँक एटीएम कोड अथवा अोटीपी नंबर फोनवरून विचारत नाही. असा फोन अाला तर सावध राहणे, हाच पर्याय अाहे. एटीएम सेंटरमध्येही कुणीची मदत घ्यायची असल्यास सावध राहिले पाहिजे. विशेषत: वयस्कर नागरिकांची फसवणूक होते. बँकेचे एसएमएस अलर्ट जोडून घ्या. कार्डचा वापर झाल्यानंतर खिशात ठेवा. असा प्रसंग अालाच तर पोलिसांना संपर्क करा
- मधुरा भास्कर, फौजदार सायबर सेल, सोलापूर

 

बातम्या आणखी आहेत...