आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीचा रणसंग्राम! : सोलापूरसाठी ४९.९३ तर बार्शीसाठी ५७.९७% मतदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ४९.९३ टक्के मतदान झाले. बार्शी बाजार समितीसाठी ५७.९७ टक्के मतदानाची नोंद झाली. सोलापूर बाजार समितीसाठी १८ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीदिवशी २२५ मतदान केंद्रांवर १२५० कर्मचारी कार्यरत हेाते. 


मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजता विजापूर रोड येथील एसआरपी कॅम्प येथे सुरू होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीवेळी एकूण ३२ टेबल असून, प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी कार्यरत असतील. 


शेतकरी मतदारसंघातील नान्नज गणाची व हमाल तोलार मतदारसंघाची मतमोजणी एका टेबलवर घेण्यात येणार आहे. यानंतर त्याच टेबलवर व्यापारी मतदारसंघाची मतमोजणी होईल. बोरामणी व होटगी गणांची मतमोजणी एकूण तीन टेबलवर होणार आहे. इतर सर्व गणांची मतमोजणी दोन टेबलवर घेण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...