आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील वर्षीपेक्षा ३ दिवस आधीच उजनी धरण मृतसाठ्यातून येणार बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेंभुर्णी- पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बंडगार्डन येथून सोमवारी सायंकाळी सहापासून ३६ हजार क्युसेकने पाणी उजनी धरणाकडे येत आहे. उजनी धरणाच्या वरील भीमा खोऱ्यातील पाच धरणांतून सायंकाळी सहा वाजता एकूण ३६ हजार क्युसेकने उजनी धरणात विसर्ग सुरू झाला आहे. रात्री आठ वाजता दौंड येथील विसर्ग २० हजार क्युसेक होता. त्यामध्ये मंगळवारी सकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने उजनी धरण मृत साठ्यामधून बाहेर येणार आहे. आता वजा ४.२९ टक्के इतका पाणी साठा झाला आहे. मागील वर्षी धरणाची पाणीपातळी वजा ३१ टक्क्यांवर गेली होती, तर यंदा वजा २० टक्केवर गेली होती. पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे भीमा खोऱ्यातील धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे. खडकवासला, कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. 


सोमवारी सायंकाळी सहा वाजता खडकवासला धरणातून १८ हजार ४९१ क्युसेक तर कळमोडी धरणातून ९ हजार २५९ क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले. वडज ३ हजार ९८६, वडिवळे ३ हजार २६०, कासारसाई १ हजार ३७७ क्युसेक असा एकूण ३६ हजार ३७३ क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले. 


निरा खोऱ्यातील वीर धरणातून कालव्याद्वारे १ हजार ७०२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवार सकाळपर्यंत भीमा खोऱ्यातील पाणी उजनी धरणात येणार असल्याने उजनी धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत मृत साठ्यातून बाहेर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या उजनी धरणात ६१.३९ टीएमसी एकूण साठा असून उपयुक्त साठा वजा २.२७ टीएमसी झाला आहे. बंडगार्डन येथून ३६ हजार १७८ क्युसेक तर दौंड येथून १९ हजार ५८५ क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे. ८ जुलै रोजी उजनी धरणाचा पाणीसाठा वजा १९.८२ टक्के इतका होता. गेल्या आठ दिवसात १५.५३ टक्के इतका पाणीसाठा वाढला. सध्या वजा ४.२९ टक्के झाला आहे. मागील वर्षी १६ जुलै रोजी बंडगार्डन येथून २० हजार ४९८ तर दौंड येथून २५ हजार ५४ क्युसेकने उजनी धरणामध्ये विसर्ग येत होता. 


भीमा खोऱ्यातील धरणांची सोमवारी सकाळची स्थिती... 
कळमोडी १०० टक्के, वडिवळे ७७.१६, कासारसाई ८१.२०, पानशेत ७३. ४८, खडकवासला १००, आंध्रा ७८.३१, मुळशी ६१. २९ टक्के. निरा खोऱ्यातील गुंजवणे धरण ६०. २५ टक्के. 

बातम्या आणखी आहेत...