आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीतील पाणी पातळी उणे साठ्याच्या वर; ६६ हजार क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेंभुर्णी- उजनी धरणातील पाणी पातळी मंगळवारी दुपारी चार वाजता उणे साठ्याच्या वर गेली. आता अधिक साठ्याकडे वाटचाल चालू झाली आहे. दौंड येथून सायंकाळी आठ वाजता ६६ हजार क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात मिसळत आहे.


दरम्यान पाऊस थांबल्याने भीमा खोऱ्यातील धरणातून सोडण्यात आलेले पाणी कमी करण्यात आले आहे. पाच धरणातून १२ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्याचा मार्गावर आहेत. गतवर्षी उजनी २० जुलै रोजी उणे साठ्याच्या वर गेले होते. यावर्षी उजनी शंभर टक्के भरण्याचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता बंडगार्डन येथून ३० हजार ९४२ तर दौंड येथून एकूण ६६ हजार ८९२ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. दरम्यान वरतून येणाऱ्या पाण्यात घट झाल्याने दौंड येथील विसर्गात उद्यापर्यंत घट होणार आहे. रविवारी व सोमवारी मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...