आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवा पुनर्विवाह करून परिवर्तनाची घातली नांदी, कडलक- रणशिंग कुटुंबीयांचे होतेय कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ऐन तारुण्यात पतीचे निधन झाल्यास समाज व नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. परंतु या गोष्टीवर मात करीत कडलक व रणशिंग कुटुंबीयांनी पुनर्विवाह करून वेगळा समाजापुढे आदर्श ठेवला आहे. कडलक व रणशिंग या कुटुंबाने विधवा पुनविर्वाह करून परिवर्तनाची नांदी निर्माण केली आहे. कडलक व रणशिंग या बौद्ध धर्मिय परिवारांनी एक ऐतिहासिक परिणय सोहळा करून परिवर्तनाची सुरुवात केली. या परिवर्तनशील निर्णयाचे समाजामध्ये मोठेे कौतुक होत आहे.

 

रेल्वे खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी शंकरराव कडलक यांचे नातू व अरुण कडलक यांचे ज्येष्ठ चिरंजीव याचे ५ महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले होते. मुलाचा ऐन तारुण्यात मृत्यू झाल्याने सून- पूनम हिच्या भावी जीवनाबद्दल कडलक व रणशिंग कुटुंबीयांनी योग्य विचार केला आणि पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला.

 

अरुण कडलक यांचे कनिष्ठ चिरंजीव विशाल व सून पूनम यांचा विवाह लावून देण्यात आला. समाजातील निवडक ज्येष्ठ व्यक्ती व निवडक लोकांशी चर्चा केली. वधूचे माता - पिता प्रकाश रणशिंग व वराचे आई -वडील अरुण कडलक व मुलाचे आजोबा शंकर कडलक आदींच्या उपस्थितीत दोन्ही परिवारातील सर्व सदस्यांनी व बौध्द समाजातील सर्व लोकांनी मान्यता देऊन हा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह पूज्य भंते राजरत्न पुणे यांनी विधिवत केला. या प्रसंगी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. वधू-वरास अाशीर्वाद देण्यासाठी चळवळीतील ज्येष्ठ नेते राजा इंगळे, राजा सरवदे, शेंडगे, प्रा. शिवाजी बनसोडे, रजनीकांत इंगळे, सिध्दार्थ चलवादी, विक्रांत पात्रे, राजेश बनसोडे, शंकर कांबळे, महादेव ओहोळसह समाजबांधव उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...