आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर, बल्लारशाह रेल्वेस्थानकांवर जंगल सफरीचा अनुभव; नागपूर विभागातील दाेन स्थानकांवर वन्य प्राण्यांची पेंटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- झाडे, फुले, पाणवठा, पक्ष्यांचा स्वच्छंद वावर, झाडांवर लटकणारी माकडे, तर पाण्यात विहार करणारी  मगर, शिकारीसाठी मार्गस्थ झालेला वाघोबा आदी नानाविध वन्यजीवांचे व संस्कृतीचे दर्शन तुम्हाला जर रेल्वे स्थानकावर झाले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.पण हे खरे आहे.नागपूर रेल्वे विभागातील बल्लारशाह व चंद्रपूर स्थानकावर रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन ताडोबातील वाघोबाच्या प्रचारासाठी स्थानकावरच वन्यजीवांचे दर्शन घडवले आहे. स्थानकांच्या भिंती रंगवूनच ते थांबले नाहीतर जंगल संस्कृतीचे हुबेहूब चित्र त्यांनी शिल्पे, अॅक्रिलिक पेंटिंगच्या माध्यमातून  रेखाटले. त्यामुळे प्रवाशांना जंगल सफरीचाही अनुभव येत आहे.    


नागपूरहून दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या बल्लारशाह व चंद्रपूर या स्थानकावर थांबतात. राेज हजारो प्रवाशांची वर्दळ. ताडोबा अभयारण्य  जवळ असल्याने रेल्वे प्रशासनाने वाघ व अन्य वन्यजीवांविषयी प्रवाशांमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता रेल्वे खात्याने हे पूर्ण स्थानकच वन्यजीवांच्या चित्रांत रंगवून काढले. स्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय असो की पादचारी जिना असो, साऱ्याच ठिकाणी वन्य प्राण्यांची छबी आपणास पाहावयास मिळते. रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेऊन या कामास सुरुवात केल्यानंतर जिल्हा प्रशासनानेदेखील आर्थिक भार उचलला. तसेच नागपूर येथील शासकीय आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर येथे उत्तम चित्रे व शिल्पे साकारली आहेत. स्थानकाच्या नावाच्या फलकावर बसलेला घुबड, पाण्याच्या टाकी जवळच्या झाडावर लटकलेला माकड, हरणांचा कळप, तर मगरीची शिकार करणारा वाघोबा हे सर्व पाहिल्यानंतर प्रवासी क्षणभर दंग होऊन जातात.  ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर गाडी मार्गस्थ होते. मात्र प्रवासी आपल्या मनात या वेगळ्याच जंगल सफरीचा अनुभव घेऊन जातात. 

 

जनजागृतीचा उद्देश  
वाघांच्या प्रचारासाठी व नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावे याकरिता बल्लारशाह व चंद्रपूर स्थानकांवर जंगलाची रचना केली. अशा प्रकारची रचना करणारे स्थानक हे बहुधा देशातील पहिले स्थानक असावे.  
- ब्रिजेशकुमार गुप्ता ,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...