आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकाऱ्यांनी धरलेला वाळू ट्रक वाहतूक दुस-या पोलिसाने जाऊ दिला, यंत्रणेच्या आशीर्वादाने तस्‍करी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शनिवारी पहाटे सहायक पोलिस निरीक्षकांनी सैफुल येथे वाळू ट्रक पडकला. त्यानंतर काहीच मिनिटात वाहतूक पोलिस तेथे पोहोचला. ट्रक सोडण्यासाठी पोलिस निरीक्षकांसोबत हुज्जत घातली.

 

दरम्यान, ट्रकचालक पसार झाला. घटनेला ३६ तास उलटल्यानंतरही गुन्हा दाखला झाला नाही. यामुळे पोलिस यंत्रणेच्या आशीर्वादानेच वाळू तस्करी सुरू आहे की काय, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाला आहे.


वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी भल्या पहाटे येतो आणि सहायक पोलिस निरीक्षकाने पकडलेला वाळू ट्रक पळून जाण्यासाठी मदत करतो. त्यानंतर या प्रकाराची माहिती सहायक पोलिस निरीक्षक कंट्राेलला देतात. या घटनेला दीड दिवस उलटल्यानंतरही पोलिस यंत्रणा ढिम्म राहाते. यावरून पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांबद्दलचा संशय गडद होतो.


शनिवारी पहाटे असा घडला प्रकार
१. शुक्रवारी रात्रीनंतर शनिवारी पहाटे विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. मोटे हे पेट्रोलिंग करत होते. सैफुलकडून कुसुमराज मंगल कार्यालयाजवळून एक ट्रक येताना दिसला. पोलिसांच्या गाडीला पाहून तो ट्रक थांबला. यामुळे पोलिसांना संशय आला.
२. पोलिसांनी ट्रक चालकाकडे कागदपत्रे आणि वाळू परवानाची प्रत विचारली. तेवढ्यात मागून एक बोलेरो कार आली. त्यातून चार जण खाली उतरले. त्यांनी तो ट्रक सोडण्यास सांगितले. मात्र मोटे यांनी ट्रक सोडला नाही. तेवढ्यात वाहतूक शाखेचे पोलिस विनोद पुजारी व एकजण तेथे आले.
सैफुल परिसरात मीरा पिठाची गिरणी समोरील रस्त्याच्या कडेला वाळू टाकून ट्रक पसार झाला.
३. वाहतूक पोलिस पुजारी यांनी ट्रक सोडण्याची भाषा केली. मोटे एेकत नसल्याचे पाहून या सर्वांनी मिळून पोलिस कारच्या पुढे थांबले. तेवढ्यात संधी साधून वाळूचा ट्रक दामटला. मोटे यांनी चालक पवार यास सांगून वाहन खड्ड्यातून बाहेर काढून पाठलाग केला. पण तो ट्रक हाती लागला नाही.
४. ट्रकमधील वाळू मीरा पिठाची गिरणीजवळ रिकामी करून ट्रकने पळ काढला. कारवाई करू दिली नाही म्हणून मोटे यांनी पहाटेच कंट्रोलला फोनवरून सर्व हकीकत सांगितली. कंट्रोलच्या डायरीत याबाबत नोंद झाली. मात्र विजापूर नाका पाेलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल नाही. वरिष्ठांनीही दखल घेतली नाही.


उद्याच चौकशी करतो
वाळूच्या या प्रकरणाबाबत मला काहीही माहिती नाही. उद्याच याची माहिती घेतो. चौकशी करतो आणि दोषीवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

 

बातम्या आणखी आहेत...