आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या कारणाने शारीरिक व मानसिक त्रास; विवाहितेची भीमा नदीत उडी मारून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो

सोलापूर- दिल्याने तिने पंढरपूरजवळ भीमा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अंजू सुबोध महाजन (वय ४१, रा. संजय नगर, विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन) असे त्या विवाहितेचे नाव आहे. पती सुबोध विजय महाजन (वय ४५, रा. संजयनगर, विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तुझ्या वडिलांची शेती तुझ्या भावास विकण्यास सांग, त्याचे पैसे आण, या कारणाने पती सुबोध हा सतत काहीना काही कारणावरून पत्नी अंजू हिचा मानसिक व शारीरिक जाच करीत होता. 


आपल्या बहिणीस त्रास देऊ नये म्हणून अंजूच्या भावाने अनंत कुलकर्णी (रा. माळशिरस) यांनी नुकतेच एक लाख रुपये दिले होते. मात्र त्यावर समाधान न झाल्याने पती सुबोध हा अापल्या पत्नीस त्रास देतच राहिला. त्रास सहन न झाल्याने अखेर तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सोलापूरहून पंढरपूरला जाऊन पंुंडलिक मंदिराच्या जवळील भीमा नदीच्या पात्रात ९ जुुलै रोजी उडी मारून जीवन संपविले. भाऊ अनंत भालचंद्र कुलकर्णी यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...