आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलाचोरही करतात घरफोडी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चेहरे कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- घरफोडीच्या घटना पुरुष चोरटे करतात हा आजवरचा समज खोटा ठरला आहे. महिलाचोरही घरफोडीसारखे गुन्हे करतात हे उघडकीस अाले आहे. दोन महिलांनी मिळून आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने यांचे घर फोडून ३ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या महिला चोरांच्या शोधात पोलिसांचे विशेष पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. 


डॉ. अनिल भगवान माने (वय ५९, रा. वीरशैव नगर, विजापूर रोड) हे पत्नी पुष्पलता आणि मुलगा धनंजय यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. ते सम्राट चौक येथील आयुर्वेद महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते कुटुंबासह परगावी गेले असता घरफोडीचा प्रकार घडला. श्वान पथक घटनास्थळी आले होते. पथकातील श्वान इंचगिरी मठाच्या दिशेने जाऊन थांबले. पोलिस ठाण्याचे पथक सोलापुरात तपास करीत असून गुन्हे शाखेचे पथक पुण्याला रवाना झाले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे हे करत आहेत. 


सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसताहेत चेहरे 
१६ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान दोन अनोळखी महिलांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. एका महिलेचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षे होते. तिच्या अंगावर चॉकलेटी कुर्ता, निळ्या रंगाची डिझाईनची ओढणी, काळ्या रंगाची त्यावर पांढरे नक्षी असलेली लेगीन्स, पायात सँडल होते. दुसरी महिला ही अंदाजे वय २० ते २५ वर्षाची होती. तिने चॉकलेटी कुर्ता, काळी लेगीन्स, नारंजी व लाल पट्टे असलेली ओढणी, पायात सँडल वापरले होते. या दोन्ही महिलांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हे चेहरे सोलापूरचे नसल्याचा पोलिसांना वाटते. चोर महिलांचे फोटो व्हाॅट्सअॅपद्वारे इतर शहरातील पोलिसांना पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...