आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाईची युवक काँग्रेसतर्फे होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्र व राज्यात गेल्या काही वर्षात उघडकीस आलेले गैरप्रकार अन् त्यावर सत्ताधारी भाजपने मौन बाळगले. वाढती बेरोजगारी, महागाई, अंधश्रद्धा, जातीयवाद या विरोधात शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी बोंबाबोंब करीत होळी करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील फडणवीस सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. 


कोनापुरे चाळ येथे काँग्रेसतर्फे होळी पेटविण्यात आली. विषमता, आतंकवाद यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी होळीच्या निमित्ताने देशात माजलेला भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, महागाई, आतंकवाद, विषमता, जातीयवाद रूपी राक्षसी प्रवृत्तीचा युवक काँग्रेसच्या वतीने होळीत दहन करण्यात आले. यावेळी देशात माजलेला भ्रष्टाचार, महागाई, आतंकवाद, अन्याय, अत्याचार, जातीयवाद रूपी राक्षसाना भस्म करून टाकण्याची होळीसमोर प्रार्थना केली. 


यावेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस राहुल वर्धा, कार्याध्यक्ष पंडित सातपुते, युवक शहर दक्षिण अध्यक्ष सैफन शेख, उत्तर युवक अध्यक्ष विवेक कन्ना, तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, संतोष अट्टेलूर आदी उपस्थित होते. 


शहरात ठिकठिकाणी पेटली होळी 
होळी रे होळी, पुरणाची पोळी अशी आरोळी ठोकत शहर व परिसरातील अनेकांच्या घरोघरी गुरुवारी भक्तिभावाने होळी सण साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी स्वस्तिक गोशाळेतर्फे शहरात गायीच्या शेणाच्या गोवऱ्या व आयुर्वेदिक वस्तू होळीत अर्पण करीत अभिनव होळी केली. होळी पौर्णिमेनिमित्त सकाळपासून छोट्यांची गोवऱ्या गोळा करण्याची लगबग सुरू होती. होळीसाठी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी केली. सायंकाळी चौकांमध्ये होळी पेटविण्यात आली. स्वस्तिक गोशाळेतर्फे शहरात सहा ठिकाणी आयुर्वेदिक होळी साजरी झाली. गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांची होळी रचून त्यामध्ये आयुर्वेदिक समिधा घालण्यात आल्या. लोकमंगल ऑक्सिजन पार्क, जुळे सोलापुरातील गणेश नगर, लष्कर, बंडे संकुलनगर, वर्धमाननगर आदी परिसरात होळी साजरी केल्याचे, प्राणीप्रेमी सुचित्रा गडद यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...