आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्डूवाडीत भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, पोलिसांना पूर्ववैमनस्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- कुर्डूवाडी शहरात भरदिवसा एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. दुपारी एक वाजता त्याचा रक्ताच्या थारोळयात पडलेला मृतदेह आढळला असून. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून केल्याच्या संशय व्यक्त केला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार विकी गायकवाड (24, मूळ राहणार माळशिरस) हा आपल्या बहिणीकडे कुर्डूवाडीत राहत होता. कुर्डुवाडीतील टोलनाक्याजवळ असलेल्या गारवा हाॅटेलजवळ विकीचा मृतदेह आढळला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृतदेह रुग्णालयात असून अद्याप फिर्याद दाखल झालेली नाही. 

 

रस्त्यावर रक्ताचा सडा
मयत विकी गायकवाड याच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार केले आहेत. भररस्त्यात त्याचा खून केल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळतात कुर्डूवाडी आणि माढा पोलिस घटनास्थळी पोहचले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या खुनाच्या घटनेच्या संदर्भात कुर्डूवाडी पोलिस स्टेशनचे इश्वर ओमासे यांनी यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की,  हा खून जुन्या भांडणाचा राग मनात धरुन करण्यात आलाचा संशय आहे. एप्रिल महिन्यात मयत विकी गायकवाड याच्यावर 307 चा गुन्हा दाखल आहे. विकी गायकवाड याने माणिक श्रीरामे व त्याचे भाऊ अर्जुन याना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या जुन्या भांडणाच्या रागातूनच  ही घटना घडली आहे असा आमचा प्राथमिक अंदाज असुन लवकरच आम्ही मारे मारके-यांना अटक करुन प्रकरणाचा छडा लावू. 

 

बातम्या आणखी आहेत...