आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्डूवाडीत युवकाचा पूर्वमैनस्यातून खून, आरपीआय कार्याध्यक्षासह 22 जणांवर गुन्हा दाखल, पाच अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- कुर्डूवाडी शहरात रविवारी भर दुपारी एका युवकाचा पूर्वमैनस्यातून धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी आज आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुभाष उर्फ बापूसाहेब जगताप यांच्यासह 22 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 

 

शहरातील गारवा हाॅटेल जवळ रविवारी दुपारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास 
विकी विष्णू गायकवाड (24) या  तरुणांची तलवार, कोयता, लोखंडी राॅडने  धारदार शस्राने निर्घृण हत्या केली होती . दिवसा ढवळ्या घडलेल्या रक्तरंजित  हत्येच्या घटनेने कुर्डूवाडी शहर रविवारी हादरुनच गेले होते.पूर्ववैमनस्यातुन सुड घेण्याच्या हेतुनेच  हा खुन झाला असा आरोप करत या प्रकरणी  अमरकुमार  माने यांनी कुर्डूवाडी पोलिसांत रविवारी रात्री  फिर्याद दाखल केली.

 त्यानुसार या प्रकरणात कुडूवाडीत गोल्डन मॅन म्हणुन ओळख असलेले माणिक श्रीरामे, आर.पी.आय चे पश्चिम महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष तथा कुडूवाडी चे उपनगराध्यक्ष सुभाष उर्फ बापुसाहेब  जगताप यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याचेसह कुडूवाडी नगरपालिकेचे नगरसेवक सुरज सुभाष जगताप,आकाश सुरेश राजगिरे, विनोद उर्फ एक्या विजय सोनवणे, अनंत विजय सोनवणे,आकाश श्रीरामे, अर्जुन श्रीरामे, संतोष मारकड, आक्रम खान,इम्रान रफीक पठाण याचेसह अन्य 10 ते 12 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

या गुन्हयातील आकाश सुरेश राजगे (वय २४) , विनोद उर्फ एक्या विजय सोनवणे (वय २४), आकाश राजाभाऊ श्रीरामे वय (२३अर्जुन रादाभाऊ श्रीरामे (वय 21) अक्रम नुरमहंमद खान वय (29) या पाच जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक तैनात केल्याचे स.पो.नि.ईश्वर ओमासे यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना सांगितले.

 

स्पर्धा परीक्षेसाठी जामीन मिळाला अन घात झाला
विकी गायकवाड याच्यावर 9 एप्रिल रोजी माणिक श्रीरामे व त्याचा भाऊ अर्जुन श्रीरामे याला मारहाण केल्या प्रकरणी यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. माढा न्यायालयाने विकी गायकवाड याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी जामीनावर सोडले होते. दरम्यान विकीचा रविवारी दुपारी परीक्षेआधीच घात झाला.

 

बातम्या आणखी आहेत...