आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडावर डोके अापटून खून; तरुणाला सक्तमजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दुकान गाळ्याचे भाडे देण्यावरून झालेल्या भांडणात नुरूद्दीन उस्मानगणी शेख (वय ३७, रा. मोतीलालनगर, साईबाबा चौक, सोलापूर) यांचा खून केल्याप्रकरणी एका तरुणाला पाचवर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. अार. उगले यांनी सुनावली. 

 

गंगाराम बाबू दाते (वय २५, रा. मोतीलालनगर, साईबाबा चौक, सोलापूर) याला शिक्षा झाली. पंधरा हजार रुपये दंड ठोठावण्यात अाला असून ती रक्कम मृताच्या वारसदारांना देण्याचे अादेश अाहेत. दाते यांच्या मालकीचे गाळे शेख यांनी भाड्याने घेतले होते. काही महिन्यांनी दुकान बंद ठेवले. यामुळे दाते यांनी दुकान गाळे रिकामे करण्यासाठी सांगत होते. ९ फेब्रुवारी २०१५ रोजी शेख व दाते यांच्यात हमरी तुमरी सुरू झाली. त्यात शेख यांचा गळा अावळून दगडावर डोके जोरात अापटल्यामुळे मृत्यू झाला. नूरजहाॅ शेख यांनी जेल रोड पोलिसात तक्रार दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. राठोड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा गुन्हा न्यायालयात िसध्द झाल्यामुळे मंगळवारी शिक्षा झाली. अारोपीला दोषी धरले होते. सरकारतर्फे संतोष न्हावकर, अारोपीतर्फे नरेंद्र कंदीकटला यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...