आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा तालुक्यात 3 दिवसांत दुसरा खुन, पुर्व वैमन्यासातुन 28 वर्षीय तरुणाचा बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा ( सोलापुर) - दिवसाढवळ्या कुर्डूवाडी शहरात धारधार हत्याराने विकी गायकवाड या तरुणाची हत्या केल्याची घटना ता. 17 रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा माढा तालुक्यातील जाधववाडी(मो) गावात एका तरुणाची पूर्ववैमनस्‍यातुन हत्‍या करण्‍यात आली. लक्ष्मण चांगदेव सुर्वे (वय 28) असे तरूणाचे नाव आहे. या तरुणाच्या घरात घुसून आई-वडीलांसमोर त्‍याला गाडीत टाकून नेत त्‍याची हत्‍या करण्‍यात आली.

 

अधिक माहिती अशी की, लक्ष्मण चांगदेव सुर्वे हा तरुण आपल्या आई वडीलांसोबत बुधवारी (ता. 20) रोजी घरात असताना घरासमोर अरविंद आटकळे (रा.कौठाळी ता.पंढरपूर) व अन्‍य 3 जण चार चाकी गाडी घेऊन आले. घरात घुसुन हत्याराचा धाक दाखवुन आई वडीलांसमोरुन लक्ष्मणला गाडीत घेऊन गेले. आपल्या मुलाला अज्ञात लोक पळवुन घेऊन गेल्याची तक्रार करायला आई वडिल टेभुर्णी पोलिसांत गेले. मात्र लक्ष्मणची हत्‍या करून त्याचा मृतदेह बसस्टॉपवर टाकला आहे, अशी माहिती आईवडीलांना मिळताच त्‍यांनी हंबरडा फोडला.

 

लक्ष्मणची हत्‍या केल्‍याप्रकरणी अरविंद आटकळे (रा.कौठाळी ता.पंढरपुर) व अन्य अज्ञाताच्या विरोधात खुनाचा गुन्हा गुरुवार दि 21 रोजी दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक खोबरे करीत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करु अशी प्रतिक्रिया त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. खुनाच्या दुस-या घटनेने माढा तालुक्‍यात मात्र खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक्षक विरेश प्रभु गुन्हेगारी रोखण्यात यशस्‍वी ठरतील काय..? असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

 

खुन पुर्व वैमनस्यातुनच
माढा तालुक्यात दिवसा घडलेली ही खुनाची दुसरी घटना आहे. कुडूवाडीत घडलेला खुन पुर्व वैमनस्यातुन घडला होता. जाधववाडी(मो) येथे घडलेला हा खुनही पुर्व वैमनस्यातुनच घडला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी मयत लक्ष्मणने अरविंद आटकळे यास मारहाण करुन त्याच्या गाडीची काच फोडल्याच्या संशयावरुन त्याचा खुन झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...